
मराठा समाज महायुतीच्या बाजूने कायम ठामपणे उभा असतो ,याही वेळेस राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.कारण मराठा समाज हा कायमच हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिलाय.असं फडणवीस म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला असंही ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण, सारथी संस्था, मराठा समजाच्या मंडळाला भरीव आर्थिक तरदूत दिली आहे, त्यामुळे मराठा समाज पूर्ण ताकदीने महायुतीच्या बाजूने उभे राहील. मराठा समजाची सहानभुती मला आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा समाज महायुतीला पाठिंबा देईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्या एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.
मराठा समाज ८० टक्के हिंदुत्ववादी आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुला पाठिंबा मिळेल. मराठा समाज महायुतीच्या बाजूने ठामपणे उभा राहील. मराठा समाजातील ८० टक्के जनता हिंदुत्ववादी असून २० टक्के पुरोगामी असावेत. मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजीने उभा राहिला आहे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मविआकडून मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. पण मराठा समजाला आरक्षण देणं, सारथी संस्था , समाजासाठी भरीव आर्थिक तरदूत देण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजाची मला सहानुभूती आहे, असा दावाही त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठा समाजात चुकीचे नरेटिव्ह पसरवण्यात आले. मला जाणीवपूर्वक खलनायक ठरवण्यात आले. त्यामागे मराठा समजाची नाराजी नव्हती. तर मविआमधील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा हात होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.