नमस्कार..!
१५|११|२०२४
॥ त्रिपुरारि पौर्णिमा ॥
🟣 कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारि पौर्णिमा म्हणून संबोधलेली आहे.
या दिवशी महादेवांनी त्रिपुरासुरास मुक्ति दिली.
🟣जेंव्हा कार्तिक पौर्णिमेस भरणी नक्षत्र क्वचित असेल तेंव्हा देखील ती तिथी “महापुण्यकारक” म्हणून मुनींनी सांगितलेली आहे.
(ब्रह्मपुराण-हेमाद्री)
(या २०२४ च्या पौर्णिमेला हा योग आलेला आहे.)
🟣 कार्तिक पौर्णिमेला पुष्कर तीर्थात स्नान केले असतांसर्व पापें जातात.
(यम)
🟣 कार्तिक पौर्णिमेस विष्णु “मत्स्यरूपी” (अवतार) झाला. म्हणून या तिथीचे ठायी दान-जप-होम केले असतां अक्षय्य फल प्राप्त होते.
(पद्मपुराण- कार्तिकमाहात्म्य)
🟣 कार्तिक पौर्णिमेचे ठायी संध्यासमयी “त्रिपुरोऽत्सव” करावा.
(भावार्चन दीपिका)
🟣 याचा संकल्पा सहित विधी:-
आचमनादी देशकालौ संकीर्त्य मम श्रीशिव प्रीतिद्वारा सकल पापक्षय पूर्वकं विमल ज्ञान शिवसायुज्याऽदि शुभ फल प्राप्तये त्रिपुराख्य दीपप्रज्वालनं तदंगत्वेन श्रीशिव पूजां करिष्ये ।
🟣 येणेप्रमाणे संकल्प करून; शिवाची यथासंभव षोळशोपचार पूजा करावी.
सायंकाळी ७२० दिवे लावावेत.
(व्रतोऽद्यापनचंद्रिका)
कांही शिवभक्त त्रिपुरवात लावतात.
या नंतर पुढील मंत्राने दिवे अर्पण करावे.
(भावार्चन दीपिका)
🟣 कीटाः पतंगाः मशकाश्च वृक्षा जले स्थले ये विचरंति जीवाः । दृष्ट्वा प्रदीपं नच जन्मभाजो भवंति नित्यं श्वपचाहि विप्राः॥
अनेन त्रिपुर दीप प्रज्वालनेन श्रीमत् त्रिपुरहरःप्रीयताम्….!
🟣 या कार्तिक पौर्णिमेस ज्या वेळी कृत्तिका नक्षत्र चालू असतां जो मनुष्य ” श्री कार्तिक स्वामींचे” दर्शन करितो; तो सात जन्म पर्यंत धनवान् आणि वेदपारंगत असा विप्र होईल.
(काशीखंड)
(कृत्तिका नक्षत्रानुसार सदरील (या २०२४वर्षीची) दर्शनाची वेळ:- रात्री ०९.१२ ते पहाटे ०२.२९ पर्यंत आहे.)
🟣 या दिवशी आवळीच्या झाडाखाली श्रीविष्णुंची पूजा करावी.
पितरांसाठी तर्पण करावे.
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त…!