• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

विकास हाच माझा धर्म घेऊन विजयसिंह पंडित निवडणूक रिंगणात..

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 14, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

गेवराई दि. (प्रतिनिधी) संपूर्ण गेवराई मतदार संघात महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचाराचा झंजावात पाहायला मिळाला. विविध गावागावात ते मतदारांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत प्रत्येक कॉर्नर बैठकीला अगदी जाहीर सभेचे स्वरूप निर्माण होत आहे. त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याने संपूर्ण मतदारसंघात घड्याळाचीच एकतर्फी हवा निर्माण झालेली आहे आणि विरोधकांची बत्ती गुल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गेवराई विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे त्यांनी तालुक्यातील खळेगाव, ब्रह्मगाव, माटेगाव, कुंभेजळगाव, रामनगर तांडा, भाट अंतरवली, राजपिंपरी, गौंडगाव, भोजगाव, देवपिंपरी, कोमलवाडी आदी गावातील मतदारांशी थेट संपर्क साधत त्यांच्याशी संवाद साधला यावेळी महायुती चे उमेदवार विजयसिंह पंडित म्हणाले की माझा धर्म फक्त आणि फक्त तालुक्याचा विकास हीच आहे. आम्हाला दादांनी सर्वसमावेशक विकासाचे राजकारण शिकविले आहे. या मातीतील माणसाच्या विकासाला आणि कल्याणासाठी मी माझे आयुष्य समर्पित केले आहे. इथल्या विकासाबरोबरच माणसांच्या सुख दुःखात मी कायम वाटेकरी राहिलेलो आहे. त्यामुळे या भागातून मला भरभरून मतदान रूपी आशीर्वाद मिळेल असा विश्वास असल्याचे शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी बैठकातून व्यक्त होताना सांगितले. मतदारसंघात आपला प्रत्येक कार्यकर्ता हा स्वतःची निवडणूक समजून लढत असल्याचा आपल्याला अभिमान वाटत आहे.

गावागावात आगमन होताच स्थानिक गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात वाजत गाजत फटाके फोडून तर कोठे महिला भगिनींच्या हस्ते औक्षवंत करून विजयसिंह पंडित यांचे जल्लोषात स्वागत केले जात आहे गावात आगमन होताच विजयसिंह पंडित गावातील महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करतात तर दर्ग्यांवर पुष्पमाला अर्पण करतात यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मतदार महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.

Previous Post

विरोधकांची छुपी युती जनतेने हाणून पाडावी-जयसिंग पंडित

Next Post

उद्धव ठाकरे, त्यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेता येत नाही……

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

उद्धव ठाकरे, त्यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेता येत नाही……

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.