ह.भ.प. महंत शिवाजी महाराज,माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांची प्रमुख उपस्थिती
गेवराई दि.१३ (प्रतिनिधी) शिवाजीनगर गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह. भ. प. महंत शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव (दादा) पंडित, माजी चेअरमन जयसिंग पंडित, व्हा. चेअरमन भाऊसाहेब नाटकर यांच्यासह कारखान्याचे संचालक, सभासद, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी ह.भ.प. शिवाजी महाराज आणि कारखान्याचे कर्मचारी राजेंद्र नवले व शंकर ढाकणे यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा करुन गव्हाणीत मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव (दादा) पंडित, म्हणाले की, साखरे बरोबरच उपपदार्थांचे उत्पादन होणार असल्यामुळे जयभवानी ऊसाला चांगला भाव देण्यास सज्ज आहे. बायप्रॉडक्टवर लक्ष केंद्रित करत १. १० लक्ष बल्क लिटर क्षमतेचा डीस्टलरी प्रकल्प पुढील हंगामात कार्यान्वित करण्यात येणार आहे, त्यामुळे निधी उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला जादा दर देताना अडचण येणार नाही. आपण राजकारणात शब्द पाळतो, आणि शब्द आपण खरा करुन दाखवला आहे. जयभवानी आपला हक्काचा कारखाना आहे, जयभवानीने शेतकऱ्यांना नेहमीच न्याय दिलेला आहे. ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार, कर्मचारी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून जय भवानीचा चालू हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे म्हणाले की, या हंगामात पाच लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवुन आम्ही काम करत आहोत. या हंगामात डिस्टिलरी, साखर कारखान्याचे मेंटेनन्सचे कामे पूर्ण झाले असून कारखाना सुरू झाल्यानंतर डिस्टीलरीचे उत्पादन ८ ते १० दिवसात सुरू होणार आहे. डिस्टीलरीकडील स्पिरीटचे उत्पादन प्रतीदिवस ४५ ते ४८ हजार बल्क लीटर होणार आहे. तसेच ७० ते ८० लाख बल्क लीटर स्पिरीट उत्पादनाचे उदिष्ट आहे. येणार्या या गळीत हंगामात उदीष्टापेक्षा जास्त गाळप करण्याचा मानस आहे. कारखाना शासनाने ठरविलेल्या तारखेला सुरू करणार आहोत. बायोगॅस सीएनजी, पोटॅंश खत, इथेनॉल या सारखे बायप्रॉडक्टचे उत्पादन घेतल्यास आपल्याला स्पर्धेत टिकता येईल. लवकरच कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या व्यवस्थापणाच्या विचाराधीन आहे असेही ते म्हणाले. महंत ह.भ.प. शिवाजी महाराज यांचे यावेळी आशिर्वादपर भाषण झाले.
यावेळी कारखाना साईटवर पोहचलेल्या पहिल्या वाहन मालकाचा रोख रक्कम देवुन गौरव करण्यात आला. ट्रॅक्टरचे मालक गव्हाणे दत्तात्रय दगडू यांना ह.भ.प महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले. याप्रसंगी कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विकास सानप, ॲड परसूराम येवले, बिपिन डरपे, यांच्यासह संचालक सर्वश्री, जगन्नाथ शिंदे, संभाजीराव पवळ डॉ. आसाराम मराठे, संदीपान दातखीळ, जगन्नाथ दिवाण, कुमारराव ढाकणे, गणपत नाटकर, जगन्नाथ काळे, बाबुराव काकडे, साहेबराव चव्हाण यांच्यासह, सुभाषराव मस्के, शांतीलाल पिसाळ, अशोक नाईकवाडे, विष्णुपंत घोंगडे सरपंच गढी, श्रीहरी पवार, यांच्यासह कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप, शेतकी अधिकारी जगन्नाथ शिंदे, चीफ इंजीनियर अशोक होके, ऋषिकेश देशमुख, प्रॉडक्शन मॅनेजर गजानन वाळके, मुख्य लेखापाल सौरभ कुलकर्णी, परचेस ऑफिसर सोळुंके, संगणक प्रमुख धनाजी भोसले, डिस्टीलरी इन्चार्ज राजेंद्र बडे, सिव्हिल इंजिनियर भालचंद्र कुलकर्णी, सुरक्षा अधिकारी नारायण औटे, सचिन उधे, वचिष्ठ कुटे, सुदाम पघळ, ज्ञानेश्वर जामकर तसेच सर्व खाते प्रमुख, पदाधिकारी, ऊस बागायतदार, ऊस तोडणी ठेकेदार, कर्मचारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.