• Contact Us
  • Home
Wednesday, February 4, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

भुलथापांना बळी पडू नका, कोणताही उमेदवार उभा केला नाही-पंकजाताई मुंडे

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 12, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा, बीड जिल्हा
0

युती धर्म पाळून विजयसिंह पंडित यांना विक्रमी मताने विजयी करा…

गेवराई दि.१२(प्रतिनिधी)
राज्यामध्ये महायुतीचे सरकार आणण्यासाठी महायुतीचे सर्व आमदार निवडून येणे आवश्यक आहे. मुंडे साहेब आमदारांची फॅक्टरी होते. मीही त्यांचीच मुलगी असून बीड जिल्ह्यातील सर्व आमदार मला निवडून आणायचे आहेत. मी कोणताही उमेदवार उभा केला नाही, भुलथापांना बळी पढू नका, मी युती धर्मच पाळणार व युती धर्म पाळून विजयसिंह पंडित यांना विक्रमी मताने विजयी करा असे आवाहन आ. पंकजाताई मुंडे यांनी केले ले. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह शिवाजीराव पंडित यांच्या प्रचारार्थ चकलंबा येथे आयोजित प्रचार सभेमध्ये बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रकाशराव सुरवसे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, किशोर कांडेकर, रविकांत राठोड, कडूदास कांबळे, डॉ. विजयकुमार घाडगे, शेख तय्यब भाई, शेख खाजाभाई, ॲड. राहुल राका, गणु आबा खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विकास कामे ही सरकारने निधी दिल्याने व वरिष्ठांनी सहकार्य केल्याने होत असतात. त्याला मी केले मी केले असे म्हणणे म्हणजे अहंकारच आहे. भैय्यासाहेबांना विकासाची दूरदृष्टी आहे. ते आमदार असताना सिंदफणा नदीच्या बॅरिजेस विषयीची त्यांची धडपड मी स्वतः पाहीली आहे. तेच ध्येय घेऊन विजयसिंह पंडित हे तालुक्याच्या विकासासाठी निवडणूक लढवत आहेत. मी त्यांच्यासोबत सहकार्य करेल व या भागाच्या विकासासाठी भरीव असे योगदान देईल. या भागातील माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य करावे. भैय्यासाहेबांनी मला शब्द दिला आहे की, मुंडे साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानच राखला जाईल. त्यामुळे विजयसिंह पंडित यांना विजय करणे हे माझे ध्येय आहे. या ठिकाणी मी ज्यांची सभा घेते त्यांचा विजय नक्की होतो.
विरोधक अपप्रचार करत आहेत. मी कोणालाही शब्द दिला नाही. त्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी न पडता उद्याच्या निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे.

मतदार संघ पाणीदार करायचा
आहे-विजयसिंह पंडित

विजयसिंह पंडित म्हणाले की, गेवराई विधानसभा मतदारसंघ हा गोदावरी व सिंदफणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात आहे. त्यामुळे मतदारसंघ पाणीदार करण्यासाठी मला संघर्ष कन्या पंकजाताई मुंडे यांचे सहकार्य लाभणार आहे. त्यांच्या सहकाऱ्यानी महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार येणार आहे. त्यामध्ये पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला मंत्रीपद भेटणार आहे. त्याचा उपयोग आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी होणार आहे. त्यामुळे आपल्या राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी व या भागाचा विकास करण्यासाठी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे भावनिक आवाहन त्यांनी केले. यावेळी पांडुरंग नागरे, दिनकर तोंगडे, माऊली खरे, मच्छिंद्र शेळके, संभाजी घाडगे, विकास सानप, उद्धव रासकर, अविनाश टिंगरे, श्रीकांत सानप, बाळासाहेब सानप, गोवर्धन टकले, गणु आबा खेडकर, अंबादास सांगळे, रवींद्र कानडे, मच्छिंद्र शेळके, माऊली खरे, सुंदर महाराज चव्हाण, गणेश सावंत, गजानन काळे, रमेश नागरगोजे, दिनकर तांगडे, फुलचंद बोरकर, गोवर्धन घोडके, मंगल राठोड, कविता डोंगरे यांच्या सह हजारो मतदार बांधव उपस्थित होते.

Previous Post

चांगल्या माणसाला संधी म्हणून डॉ.योगेश क्षीरसागरांना संधी द्या-पंकजाताईंचे आवाहन

Next Post

विजयसिंह पंडितांना करायचाय सिंदफना नदीच्या पाणलोट क्षेत्राचा विकास…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

विजयसिंह पंडितांना करायचाय सिंदफना नदीच्या पाणलोट क्षेत्राचा विकास…

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.