• Contact Us
  • Home
Saturday, February 7, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

जयदत्त क्षीरसागर यांनी केली भूमिका स्पष्ट.खोड अजून मजबूत आहे ,मी स्व.काकूंच्या संस्कारात वाढलोय…

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 12, 2024
in बीड जिल्हा, ऑनलाईन वृत्तसेवा
0

बीड(प्रतिनिधी)
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली असून आपण स्व.काकूंच्या संस्कारात वाढलोआहोत ,खोड अजून मजबूत आहे. दोन दिवस सारी राजकीय परिस्थिती कार्यकर्त्यांना बोलून समजून घेतली आहे,त्यांच्या भावना समजून योग्य तो निर्णय घेतला आहे. आगामी काळात आपल्याला जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत निवडणुका जोमाने लढायच्या आहेत तेव्हा सारे मनःपूर्वक कामाला लागा असे आवाहन निलकमल हॉटेलच्या सभागृहात आयोजित भरगच्च मेळाव्यात माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

यावेळी उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर,डॉ.विठ्ठल क्षीरसागर,रोहित क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर,विजयाताई महिंद्रे,सारिकाताई क्षीरसागर हे क्षीरसागर कुटुंबीय उपस्थित होते.

आपल्या भावना विस्ताराने व्यक्त करताना ते म्हणाले की, मी आज परत एकदा सर्वांच्या समोर आलो आहे, दोन दिवस संपूर्ण राजकीय परिस्थिती आणि आपल्या एकूण भावनेचा विचार करून आणि पुढील राजकीय आयुष्याचा विचार करून एक चांगला निर्णय आपण घेत आहोत, आपण आयुष्यभर माझी साथ दिली आहे प्रत्येक निवडणुकीत आपण खंबीरपणे पाठीशी राहिलात आपण विश्वासाने काम करत राहिलो,अर्ज मागे घेईपर्यंत हे गणित कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं मात्र एकूण सुरू असलेल्या सर्वच राजकीय चित्रावरून अर्ज मागे घेण्याचा आपण निर्णय घेतला,

आपल्याला आपले ध्येय गाठायचे होते, उद्दिष्टे आपण ठरवलेली होती परंतु नाईलाजाने आपण अर्ज माघार घेण्याचा निर्णय घेतला, आयुष्याच्या या वाटचालीत अनेक चढ उतार आपण बघितले आहेत, यश अपयश पचवलेलेच आहे सध्याचे चित्र समोर आहे गेल्या सहा महिन्यापासून आपण सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, प्रचंड प्रतिसाद देखील मिळाला मात्र असे असतानाही जो निर्णय घेतला तो घेत असताना माझ्याही मनाला खूप वेदना झाल्या परंतु माझ्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांची मने देखील महत्त्वाची होती काही निर्णय, गोष्टी कार्यकर्त्यांच्या मतावरच ठरत असतात आगामी काळात आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा अनेक राजकीय प्रवासातून जायचे आहे त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन आपण आजचा निर्णय घेत आहोत .

प्रारंभिक बैठकीमध्ये आपण ज्या भावना व्यक्त केल्या त्यानुसारच आपण पुढे जाणार आहोत, मी विश्वास देऊ इच्छितो आगामी काळात माझ्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखला जाईल याची काळजी घेण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी आपण वेळ मागत होतो तो क्षण आज उजाडला आहे,आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार आणि म्हणण्यानुसार सर्व गोष्टी आगामी काळात होतील,जे पूर्वी होते तेच आजही राहील आणि पुढेही राहील,काळजी करायची गरज नाही आणि निराश होण्याचीही गरज नाही,सगळं संपलंय अशी भावना निर्माण झाली होती अनेकजण गैरसमज पसरवत होते की यांचे आता संपले,आपल्याला रान मोकळे झाले पण खोड अजून मजबूत आहे हे लक्षात ठेवा,पुन्हा नव्याने उभारण्याची हिंमत अजून खचलेली नाही
माझा प्रत्येक कार्यकर्ता हा माझा खंदा कार्यकर्ता आहे त्याला वाऱ्यावर सोडून मी जाईल का?
स्व .काकूंच्या संस्कारात वाढलो आहोत,प्रत्येक जातीधर्मातील तळागाळातील माणूस आजही जोडलेला आहे,माझ्या जीवात जीव असे पर्यंत तो उघडा पडणार नाही याची खात्री आणि विश्वास आज देतो तेव्हा आज आपण सर्वांच्या हितासाठीच डॉ.योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा देत आहोत,आपल्या विचारानुसार आणि मतानुसार तो सुद्धा योग्य तो सन्मान राखील याची शाश्वती देतो
भविष्यात होणारी वाटचाल ही आपल्या मतानुसारच चालेल.

Previous Post

ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह ,तरुणांना अर्थसहाय्य -कॅप्टन आशिष दामले यांची ग्वाही…

Next Post

थोड्याच वेळात पंकजाताईची चकलांबा येथे जाहीर सभा…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

थोड्याच वेळात पंकजाताईची चकलांबा येथे जाहीर सभा…

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.