वीर सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने कॅप्टन दामलेंचा सत्कार.
बीड- हाजारो ब्राह्मण संघर्ष योध्यानी विविध माध्यमातून आंदोलन केल्यानंतर महायुती सरकारने सकारात्मक निर्णय घेत परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापन केले. पहिला अध्यक्ष म्हणून मला संधी दिली या संधीचे मी सोने करणार असून ब्राह्मण समाजातील होतकरू तरुणांना अर्थसहाय्य, वेद पाठशाळांना अनुदान आणि पुण्या मुंबईत विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह,अन्नछत्र आदी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्नशील राहील असे वचन परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे पहिले अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी दिले.
रविवारी अजिंक्य पांडव यांच्या निवासस्थानी कॅप्टन आशिष दामले यांचा परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वीर सावरकर प्रतिष्ठानच्या आणि सर्व ब्राह्मण समाज संघटनांच्या वतीने सत्कार केला . यावेळी बीड शहरातील ब्राह्मण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागरही यावेळी उपस्थित होते .आपल्या भाषणात कॅप्टन आशिष दामले यांनी ब्राह्मण समाजाच्या स्थितीबद्दल विस्ताराने माहिती देत परशुराम आर्थिक विकास महामंडळाला सध्या पन्नास कोटी 50 कोटी उपलब्ध करूनदिले आहेत, आगामी काळात महामंडळाला सरकारकडून 500 कोटी रुपये उपलब्ध करून घेतले जातील .सर्व जातीत सहोतकरू आणि गरीब लोक असतात ,या लोकांना सरकारकडून मदतीची व्यवस्था हवी असते, ही गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्राह्मण समाजाचे मागणीला मान देत परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. आजही पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी ब्राह्मण विद्यार्थी विद्यार्थिनीना सहजपणे राहण्याची सोय होत नाही, त्यांना एक वेळ जेवून अभ्यास करावा लागतो. ब्राह्मण विद्यार्थ्यात मध्ये ॲनिमियाचे प्रमाण वाढलेले असून याचे कारण म्हणजे हे विद्यार्थी फक्त एक वेळ जेवण घेऊन शिकतात आणि अभ्यास करतात. आगामी काळामध्ये ब्राह्मण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी ठीकठिकाणी वस्तीगृह उभारण्याचा आपला संकल्प आहे .महायुती सरकारने राज्यात चांगली कामे केली आहेत आणि अजूनही महायुतीला महाराष्ट्रात विकास कामांचा आणि प्रभावी धोरणांची अंमलबजावणी करायची आहे. यासाठी पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यामध्ये येणे ही सर्वसामान्यांची गरज आहे. ब्राह्मण समाज सदैव महायुतीच्या पाठीशी उभा राहिला असून मी राज्यभर दौरा केल्यानंतर असे लक्षात आहे आले आहे की, यावेळी पुन्हा एकदा महायुतीचे सरकार निवडून येणार आहे. बीड विधानसभा मतदारसंघातही आपण महायुतीचे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना विजयी करावे असे आवाहन कॅप्टन आशिष दामले यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीर सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिंक्य पांडव यांनी केले .बीड शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दोन भव्य पुतळे असून सावरकरांच्या नावाने एक विद्यालय, एक महाविद्यालय कार्यरत आहे या संस्था राष्ट्रभक्त विद्यार्थी घडवत आहेत. ब्राह्मण समाजातील होतकरू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना परशुराम आर्थिक विकास महामंडळाकडून आर्थिक सहाय्य व्दिले जावे, ब्राह्मण तरुणांना रोजगार उपलब्ध करावा आणि ब्राह्मण समाजाला संरक्षण देण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली .वीर सावरकर प्रतिष्ठान राबवत असलेल्या उपक्रमाची माहितीही यावेळी पांडव यांनी दिली.
ज्येष्ठ पत्रकार महेश वाघमारे म्हणाले की जसे सर्व समाजामध्ये गरीब लोक ,मध्यमवर्गीय लोक आणि श्रीमंत लोक असतात तशीच स्थिती ब्राह्मण समाजाची आहे .ब्राह्मण समाजातील पुरोहित वर्गाला आरक्षणाची नाही तर संरक्षणाची देण्याची गरज आहे .पुरोहित वर्ग आपल्या सेवेद्वारे जगाच्या कल्याणाचा आशीर्वाद ईश्वराकडे यजमानांच्या माध्यमातून करत असतो आणि त्यातून त्यांना अत्यल्प रूपाने दक्षिणा प्राप्त होते. ब्राह्मण पुरोहितांसाठी शासनाने अर्थसहाय्य योजना तयार करायला हवी , ब्राह्मण समाज सदैव युतीच्या पाठीशी उभा असतो, यापुढे हा समाज युतीच्या मागेच ठामपणे उभा राहील म्हणून या समाजासाठी वेदपाठ शाळांना अनुदान आणि ब्राह्मण समाजातील तरुणांना भरीव अर्थसहाय्य आणि वेद अध्ययनासाठी, पुरोहित्य शिकण्यासाठी शिष्यवृत्ती द्यावी.
यावेळी महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महायुतीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्र आणि त्यातही बीड जिल्ह्यात मोठी विकास कामे राबविण्यात आली . उपमुख्यमंत्री अजित पवार,पालकमंत्री धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे यांचे मोठे सहकार्य लाभले, आगामी काळातही बीड विधानसभा मतदारसंघात सर्वांगीण विकास करण्याचे आपला संकल्प आहे , हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मी महायुतीच्याकडून निवडणूक लढवत आहे. ब्राह्मण समाज सदैव क्षीरसागर कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला आहे .या निवडणुकीतही माझ्या पाठीशी उभा राहून आशिर्वाद द्या असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम जोशी यांनी तर आभार प्रदर्शन प्रेरक वैद्य यांनी केले .या कार्यक्रमास डॉक्टर यू डी कुलकर्णी , प्रशांत आंबेकर ,ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी ,परशुराम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी , अक्षय भालेराव, गणेश जोशी ,नगरसेवक सुभाष सपकाळ, मनोज पाठक, डॉक्टर सुहास देशपांडे, श्याम कुलकर्णी डॉक्टर मनोज पोहनेरकर, विशाल जोशी, प्रमोद कुलकर्णी,प्रदीप मुळे आदी उपस्थित होते.