नमस्कार..!
दि. १२|११|२०२४
*॥ प्रबोधिनी एकादशी ॥*
🟣 आषाढ शुद्ध एकादशीला निजलेल्या भगवंताला; कार्तिक शुद्ध एकादशीला रात्री; श्रद्धा व भक्तियुक्त होऊन उठवावे.
(ब्रह्मपुराण- हेमाद्री & भविष्यपुराण-मदनरत्न)
🟣 अथवा हा विधी द्वादशीला करावा.
(रामार्चन चंद्रिका)
(आपापल्या कुलपरंपरे नुसार कार्य करावे. )
🟣 याचा विधी..
देशकालौ संकीर्त्य..
*सपरिवारस्य मम श्रीमहाविष्णु प्रीतिद्वारा सकल पापक्षय पूर्वकं धर्मार्थ-काममोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थ षोळशोपचारैः महाविष्णु पूजां करिष्ये ।*
🟣 येणेप्रमाणे संकल्प करून श्रीविष्णुंची षोळशोपचार पूजा करावी.
🟣 *नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने । नमस्तेस्तु हृषीकेश गृहाणार्घ्यं नमोस्तुते ॥*
(पूजासमुच्चय)
या मंत्राने देवाला अर्घ्यदान करावे.
केलेली पूजा परमेश्वराला अर्पण करावी.
🟣 या नंतर रात्री वाद्यांचा मोठा गजर , घंटानाद इ. करित होत्साता तसेच पुरोहितांकडून; ब्रह्मेंद्ररुद्राग्नि○३ मंत्र, इदंविष्णु○१ मंत्र योजागार○३मंत्र पठण करित देवाला उठवावे.
(वाराहपुराण & ब्रह्मपुराण )
_____________________
🟣या दिवशी (आषाढांत घेतलेल्या) चातुर्मास्य व्रतांची सांगता करावी.
(महाभारत & लघुनारद)
卐 चार महिने ज्याने जो पदार्थाचा नियम केला असेल (म्हणजे तो पदार्थ भक्षण न करण्याचा नियम केला असेल) तो पदार्थ ब्राह्मणाला सांगून भक्तिने दक्षिणासह तो (पदार्थ) द्यावा.
(ब्रह्मपुराण)
🟣 चातुर्मास्य व्रतांच्या सांगतेचा मंत्र:-
*इदं व्रतं मया देव कृतं प्रीत्यै तव प्रभो । न्यूनं संपूर्णतां यातु त्वत् प्रसादात् जनार्दन ॥*
(निर्णयामृत-सनत्कुमार)
___________________
🟣 कार्तिक शुद्ध एकादशीला (ताराबळ-चंद्रबळ) पाहून; श्रीशिव व विष्णु यांच्या मंत्रांची दीक्षा ग्रहण करावी.
कारण; कार्तिक मासात दीक्षा ग्रहण केली असतां ती दीक्षा जन्ममरणां पासून सोडविणारी म्हणजे *मुक्ति* देणारी होते.
(श्रीनारद)
_____________________
🟣 या दिवशी तुलसीच्या काष्ठांची माला (पुढील मंत्राने) धारण करावी.
तुलसीच्या काष्ठांची माला केशवाला अर्पण करून; ती माला जो मनुष्य भक्तिपूर्वक धारण करतो; त्याचें पातक (पाप) निश्चयाने रहात नाही.
( स्कंदपुराण- द्वारकामहात्म्य- विष्णुधर्म)
🟣 तुलसी मालेच्या प्रार्थनेचा मंत्र:-
*तुलसीकाष्ठ संभूते माले कृष्णजनप्रिये । बिभर्मि त्वामहं कंठे कुरु मां कृष्णवल्लभम् ॥*
(निर्णयसिंधू)
_____________________
🟣 या दिवशी तुलसीपूजन करावे.
तसेच; तुलसी विवाह आरंभ होतो आहे.
_____________________
🟣 *या दिवशी भद्रा संपल्यावर* (भद्रा समाप्ती वेळ:- ११.३८ (प्रातः) *इक्षुरस पान* (उसाचा रस पिणे) *करावे.*
वे.शा.सं.अमोलशास्त्री जोशी,
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त..!