• Contact Us
  • Home
Wednesday, March 25, 2026
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

विजयसिंहंसाठी अमरसिंहांनी कंबर कसली….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 11, 2024
in ऑनलाईन वृत्तसेवा
0

गेवराई( प्रतिनिधित्व)
जेंव्हा जेंव्हा माझ्या लोकांवर वेळ आली त्या त्या वेळेला मी रस्त्यावर आलो, लोकांच्या हितासाठी संघर्ष केला. दुष्काळात जनता होरपळत होती, तेंव्हा सरकार दरबारी भांडून पाणी आणले. हे माझे काम आहे आणि केले. विरोधकांनी काय केले हे त्यांना विचारुन गेल्या दहा वर्षांचा हिशोब मागा आणि मला भविष्यात या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी संधी द्या. महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना विजयी करुन मला बळ द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केले.

गेवराई विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी चकलंबा सर्कलचा प्रचार दौरा करून येथील शेळके वस्ती, सोनवणे वस्ती, निंबाळकर वस्ती, बाभुळगाव तांडा व विविध ठिकाणी मतदाराशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अडचणीच्या काळात जो आपल्या मदतीला येतो तोच आपला खरा नेता. शिवछत्र परिवार लोकांच्या अडचणीच्या काळात कायम लोकांसोबत राहिला. माझ्या तालुक्यातील जो कोणी अडचणीत येईल त्याच्यासाठी मी कायम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो. कोरोना सारख्या कठीण काळात आपण लोकांना धीर दिला त्यामुळे आज लोका आपल्या भोवती आहेत. विरोधक आज संभ्रम निर्माण करतील. आपल्या भावनाना हात घालतील. भुलथापा मारतील. अशा परिस्थितीमध्ये आपल्या कामाचा माणूस कोण याचा विचार करून गेवराई तालुक्याच्या उद्याच्या भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना मतदान रुपी आशीर्वाद देऊन विक्रमी मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले

अमरसिंह पंडित यांनी चकलांबा सर्कलचा झंजावाती प्रचार दौरा केला‌ ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांच्या कॉर्नर बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी मतदारांनी विजयसिंह पंडित यांना विजयी करण्याचा निर्धार बोलून दाखवला.

Previous Post

भाजप पूर्ण ताकदीने क्षीरसागरांच्या पाठीशी-मुंडेंची ग्वाही…

Next Post

प्रबोधिनी एकादशी..

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

प्रबोधिनी एकादशी..

ताज्या बातम्या

अजितदादांच्या स्वप्नातील जिल्हा घडविण्यासाठी सुनेत्राताई कटिबध्द

February 12, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे तीन खाती…

January 31, 2026

घोषवादन – नवति स्वरशक्तीचा;आज बीड येथे जागर ….

January 4, 2026

गिल आऊट ईशान इन:टीम इंडिया घोषित..

December 20, 2025
युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025

  • Contact Us
  • Home

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.