बीड- नगरपरिषद हद्दीतील वाढत चाललेले अशुद्ध वातावरण, अशुद्ध पाणी पिण्यासाठी, तेही कधीच वेळेवर न देऊ शकणारी यंत्रणा. सांडपाणी नियोजनाबाबतही शून्य कार्यवाही. रस्ते आणि नाल्या यांची कुठेही परस्पर पूरक योजना नसल्याने रस्त्यावरच्या खड्ड्याला गाडी मोटरसायकल काय पण पायी चालणे अवघड होणे याचा सराव झालेले नागरिक या सर्वच समस्याला कंटाळलेले आहेत.
शहर आणि शहरालगत वाढलेली वस्ती या भागातील लाईट बिल न भरू शकल्यामुळे अनेकदा पथदिवे बंद राहणे, लाईटची देखभाल दुरुस्ती तर कागदपत्रावरच केली जाते की काय? असं वाटतं. कोणीतरी नगर विकासाचा आराखडा तयार करतो, तो मांडतो ,कोणीतरी त्यावर निधी मंजूर करून घेत गाजावाजा करतो आणि कोणालातरी आडवे घातले जाते आणि योजनांचा, घोषणांचा आश्वासनांचा नुसता पाऊसच पडला जातो, ज्यामुळे नैसर्गिक पावसात हा सर्व विकास उघडा पडतो. शहर आजारी पडते. नगर परिषदेच्या नावाने नुसते खडे फोडले जातात तेव्हा प्रशासन शासनाकडे बोट दाखवते, थातूरमातूर दुरुस्त्या निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी कामांची सुरुवात उद्घाटने, आश्वासने देऊन दिवसा मागे दिवेस नव्हे तर वर्षानुवर्ष हेच बीड नगरपरिषद बाबतचे चित्र रेखाटलेले आहे.
“चिखलबीड” झाल्यावर आजारी
पडणार नाही तर काय?
नगर परिषदेच्या सभागृहात विरोधी पक्षच काय पण एखादी व्यक्ती देखील नीट उभा राहणार नाही याची काळजी येथील शासन प्रशासन हात मिळवणी करून मोठ्या कौशल्याने कामकाज करतात, हे सर्वांनी आता ओळखून घेतले आहे. हे सर्व दुःख, वेदना ,अशुद्धता, आजार दूर करण्यासाठी योग्य डॉक्टर आजपर्यंत समोर दिसत नव्हता. एकवेळेस स्व. विनायकराव मेटे यांनी नगरपरिषदेत लक्ष घातले होते तेव्हा सर्वांचे धाबे दनानले होते पण मेटे साहेबांचे अपघाती निधन झाल्याने परत नगर परिषदेकडे कोणी बघितले नाही, काहींनी प्रयत्न केला पण त्यांना देखील फार यश पदरी पडू दिले नाही. डॉ .ज्योतीताई मेटे यांनी शिवसंग्रामची धुरा हाती घेतली आणि प्रशासनातील मोठा अनुभवाच्या शिदोरीवर अभ्यास सुरू केला, बीड नगर परिषदेचा आजार लक्षणे आणि उपाय यावर बारीक नजर ठेवून त्यासाठीचे एकच निवेदन दिले ,ठिय्या मांडून नगर परिषदेच्या दालनात बसल्या, तेव्हा परत स्व. विनायकराव मेटे यांची आठवण सर्वांना झाली आणि नगरपरिषदेच्या आजारावर योग्य उपचार गरज पडल्यास ऑपरेशनची तयारी ज्योतीताईच करू शकतात हा विश्वास निर्माण झाला,
अशा वेळीच ही विधानसभेची निवडणूक होत आहे. सरकार दरबारी योजना मांडणे, त्या खेचून आणणे आणि योग्य अंमलबजावणी करून घेणे हे काम आणि शक्ती त्या भागातील लोकप्रतिनिधीकडे असली पाहिजे ती ज्योतीताई कडे आहे. अभ्यासपूर्ण मांडणी, पाठपुरावा, सर्वयोग्य नियोजन करण्यासाठीची शक्ती, युक्ती, बुद्धी त्यात ठेवून आहेत. बीड नगरपरिषद आणि सभोवतालच्या वस्त्यांना या जुनाट आजारापासून मुक्त करण्यासाठी, निरोगी ठेवून यापुढे अधिक सशक्त बनवण्यासाठी योग्य डॉक्टर ज्योतीताईच्या रूपाने मिळू शकतो, त्यांच्या दृष्टीची एकच झलक लक्षवेधी ठरली आहे ती म्हणजे, शहरात महिलासाठी म्हणून नगर परिषदेची एकही वॉशरूम, टॉयलेट, मुतारी आजपर्यंत बांधू शकले नाहीत, बालउद्यान नाही, रस्ते, पाणी, नाल्या, पथदिवे याबरोबरच आरोग्य सुविधा केंद्र, अभ्यासिका, घनकचरा व्यवस्थापन या विषयातही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
एकाधिकारशाही संपवून, बीडला स्मार्ट सिटी होण्यासाठी मोठमोठ्या योजनावर काम करण्याची सर्व अभ्यास ज्योतीताईंनी करून ठेवला आहे, सर्व अशुद्धता दूर करून शुद्ध पोषक आरोग्यदायी वातावरण शहराचे होण्यासाठी डॉक्टर ज्योतीताई यांच्यावर बीड शहरातील नागरिक अशा ठेवून आहेत,या पार्श्वभूमीवर ही विधानसभेची निवडणूक महत्वाची ठरते आहे.