नमस्कार..!
दि.०९|११|२०२४
*॥ गोपाष्टमी ॥*
🟣 कार्तिक शुक्लातील जी अष्टमी तिला *”गोपाष्टमी “* असे म्हणतात.
🟣 या दिवशी भगवान गोपालकृष्णांनी गोपांसह गायींना प्रथम चरावयास नेले.
🟣 या अष्टमीला गोपूजन करावे.
(गो-पूजा पद्धती पूर्वी दीपावलीच्या “गोवत्स द्वादशी व्रतात सांगितलेली आहे.)
🟣 या दिवशी गायीची पूजा करून; गायीला प्रदक्षिणा कराव्या. गायींच्या बरोबर रानात जाणें इत्यादीं करावे.
असे केल्याने *”इष्टमनोरथ”* पूर्ण होतात.
(धर्मसिंधू)
वे.शा. सं. अमोलशास्त्री जोशी,
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त..!