शिवसंग्राम हे स्व. विनायकराव मेटे यांचा परिवार ,त्यांच्या पाश्चात मातृशक्ती डॉ ज्योतीताई मेटे मोठ्या धाडसाने, कष्टाने सावरला. त्या जशी शिवसंग्राम साठी “मातृशक्ती” आहेत, तसेच मराठा समाज आणि तमाम अठरापगड जाती- जमाती, धर्मासाठी “माऊली” झाल्या आहेत. या निवडणुकीच्या वैचारिक – अस्तित्वाच्या -सत्वाच्या लढाईत सर्व परिवार सदस्य एकत्र येऊन लढा देण्यासाठी सज्ज झालेले आहेत.
दैत्य ,असुरी, विनाशकारी शक्तीचा नाश करण्यासाठी स्त्रीशक्तीला शक्तीरुपिणी होऊन दुष्टाचा संहार करून सज्जनशक्तीला आधार देण्यासाठी दशप्रहरधारीनी, महिषासुरमर्दिनीची शौर्य कथा म्हणजेच स्त्रीशक्तीचा अविष्कार दाखवते. स्त्री -माता -आई -माऊली जशी असते तशीच ती दुर्गाआवतार पण धारण करून दृष्ट शक्तीचा नायनाट करते,
मोठ्या परिश्रमातून मिळवलेली उच्चपदस्थ नोकरी सोडून देणे गरजेचे नसताना शिवसंग्राम परिवाराच्या देखभालीत कुठेही कमतरता पडू नये हाच विचार, हा परिवार उंचीवर घेऊन जाण्यासाठीचेस्व.स्व.मेटे साहेबांनी स्वप्न पाहिलेले पूर्ण करण्यासाठी म्हणून नोकरीचं त्यागपत्र देऊन समाजाच्या संसारासाठी, शिवसंग्राम या कुटुंबासाठी मायमाऊली डॉ ज्योतीताईंनी शिवसंग्रामचे सूत्र स्वीकारले आणि निवडणुकीचा रणसंग्राम समोर आला , कुशल नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, धाडस, गरज पडल्यास तेवढ्यात आक्रमक बाणा ठेवून स्व. विनायकरावांचा वसा आणि वारसा तेवढ्यात शक्तीने -युक्तीने पुढे घेऊन जाणाऱ्या “शक्तीरुपिणी” ज्योतीताई बद्दल कार्यकर्ते आणि सामान्य जनमानसात आता एक विश्वासाची ज्योत पेटली आहे. विस्थापितांसाठी, निष्ठावंटासाठी “रणरागिणीचे” रूप धारण करण्याची गरज पडली तरी त्या बुलंद तोफ म्हणून कुठेही मागे हटणार नाहीत. हा दृढविश्वास निर्माण झाला आहे.
केवळ आमच्यासाठी ताईसाहेब लढत आहेत तर आम्हीही कुठेही कमी पडणार नाहीत, हा शिवसंग्रामच्या मावळ्यामध्ये परवलीचा शब्द झाला आहे.
मराठा नेतृत्व आणि अठरापगड समाजासाठी न्याय भूमिका सतत आक्रमकपणे मांडणारे स्व.विनयकराव मेटे सारखाच विश्वास समाजात आणि विशेषतः महिला वर्गात ताईच्या झंजावातामुळे निर्माण झाला आहे. निवडणूक निशाणी “बॅटरी टॉर्च” मिळाली ते योग्य दिशा दर्शकच आहे. बीड मतदार संघाला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याकरिता ज्योतीताई कार्य करत आहेत, ते अधिक मोठ्या शक्तीने करण्यासाठी तेवढाच मोठा पाठिंबा मिळणं गरजेचे आहे. विधानसभेत येथील अंधकारावर प्रकाश टाकण्यासाठी, आपल्या भागातील दुष्ट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी, समाजातील असुरीशक्तीचा नायनाट करून सुजलाम सुफलाम बीड होण्यासाठी मतदार मतदान नक्कीच करतील.