परळी मतदार संघातील सर्फराजपूर गाव गेल्या एक महिन्यापासून अंधारात आहे. लाईट नसल्यामुळे गावकऱ्यांचे जीवनमान खूपच अडचणीत आले आहे. लोकसभेला खासदार बजरंग सोनवणे यान लीड दिल्यानेच हा अन्याय केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सरकारची आणि प्रशासनाची जबाबदारी जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याची आहे, मग त्यांच्यावर राजकीय दबाव का आणायचा? सामान्य नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळायलाच हवेत. लाईटसारखी गरज रोखून ठेवून गावकऱ्यांना नरक यातना का भोगायला लावता? परळीच्या जनतेला न्याय मिळवून द्यायची वेळ आता आली आहे.विकासाच्या नावावर निवडणुका जिंकून मिळालेला सत्ता वापर सामान्य जनतेसाठी आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी.असाही आरोप होत आहे.