बीड – (प्रमोद कुलकर्णी) संपूर्ण आयुष्य समाजासाठी लढत, समाजासाठीच बलिदान देणाऱ्या लोकनेते स्व. विनायकराव मेटे यांच्या वारस डॉ.ज्योतीताई मेटे यांना समाज -मतदार न्याय देयील कारण केवळ मोठ्या नेतृत्वाच्या आकस्मात निधनानंतर पाठबळ देऊन सहानुभूती किंवा आदरभाव व्यक्त केला जातो ही स्वाभाविक भावना असते, स्व. विनायकराव मेटे यांचे कर्तृत्व महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला, मराठा समाजाला ,सर्व राजकीय क्षेत्राला चांगलेच माहित आहे, या एकाच न्यायाच्या आधारे ज्योतीताईचा योग्य सन्मान,निवड व्हायला पाहिजे .
मेटे साहेब होते तोपर्यंत प्रशासकीय सेवेत ताई आपला ठसा उमटवण्याचे काम इमाने इतबारे त्या करत होत्या, त्यांच्या माहेरची पार्श्वभूमी पाहिली तर प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या लाटकर कुटुंबातून त्या येतात.
विस्थापित -गोरगरीब ,जनतेच्या, समाज बांधवांसाठी सातत्याने आक्रमकपणे कार्यरत राहणारे, शिवसंग्राम उभा करणारे ,विनायकराव मेटे यांचे एका मराठा समाजाच्या कल्याणासाठीच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीला जाताना मुंबई प्रवासात आघात झाला आणि मोठ्या कष्टाने परिवर्तनशील, पराक्रमी मावळ्याचे संघटन ऐन उमेदीत “शिवसंग्रामवर दुःखाचा डोंगर कोसळला. अंधार होतो की काय? सर्व काही कोलमडते काय ? असे वाटत असताना एक ज्योत कुटुंबासाठी जी आजपर्यंत प्रशासनात कार्यरत होती ती आपला मोठा आधार होऊन अंधार दूर करुशकते म्हणून शिवसंग्राम परिवारात आशेचा किरण दिसत होता. इकडे समाजकारणात ,राजकारणात मेटे साहेबांचा योग्य वारस ठरू शकतात हा विश्वास वाढत होता. व्यक्तिगत कौटुंबिक आघात ,अश्रूंना आवरून ज्योतीताईंनी ‘शिवसंग्राम हा मेटे साहेबांचा परिवार, तोच आपला परिवार” यापुढे हेच आपले संपूर्ण कुटुंब, म्हणून एका आईने माऊलीचे रूप स्वीकारले.
विनायकराव मेटे यांच्या सर्व इच्छा ,आकांक्षा ,अपेक्षा विस्थापितांसाठीचा लढा, गोरगरीब समाजासाठी छोट्या छोट्या उपक्रमातून सुरुवात झाली, मेटे यांनी जमवलेली “कार्यकर्ता ही संपत्ती” ज्योतीताईंनी मनापासून जोपासली आणि त्यात वाढ ही होऊ लागली, जसे साहेबांच्या संपर्कात आलेला कायमचा जोडला जात असे तसेच ताई साहेबांची भेट झाली की तो शिवसंग्राम परिवाराचा सदस्य होऊ लागला आहे, ही सहानुभूती आणि विश्वास मिळवण्यात ज्योतीताई कुटुंबप्रमुख म्हणून विजयी झालेल्या आहेतच,
निवडणूक हे समाज परिवर्तनासाठीचे एक मोठे साधन आहे म्हणून निवडणुकीत सक्रिय सहभाग असला पाहिजे, लोकसभा निवडणुकीत योग्य तेवढा सहभाग घेतला. बीड विधानसभेसाठी वारसदार ,एक सक्षम नेतृत्व म्हणून सर्वामुखी ज्योतीताईचे नाव तेव्हाच पक्के झाले होते.
निवडणुकीच्या लढाईत एक सक्षम महिला नेतृत्व ,खंबीर वारसदार, निष्ठावंत कार्यकर्ता संपत्ती, प्रशासकीय मोठा अनुभव, उत्तम संभाषण कौशल्य, अभ्यासू व्यक्तिमत्व .जाती पातीचा भेदभाव नाही पण मराठा समाजासाठीचा म्हणून समाज सुदृढ -सक्षम-सबळ करण्यासाठीचा योग्य डॉक्टर हा लौकिक आणि समाजासाठी आयुष्यभर कार्यरत राहत बलिदान देणाऱ्या स्व. विनायकराव मेटे यांच्या वारसाला समाज न्याय देईल. कोणताही पक्षीय विचार न करता “अव्हेलेबल बेस्ट” म्हणून मताधिक्य नक्की मिळेल असेच बोलले जात आहे.