मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत, मी वाट बघतोय. कुठल्या लोकांना मतदान करायचे नाही त्यांची यादी तयार आहे. काही ठिकाणी आमचेही उमेदवार आहेत.
ओबीसींकडे या राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी, नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे, ओबीसींना माझी विनंती आहे की आता जर तुम्ही घरात बसलात तर 2024 नंतर ओबीसींचे आरक्षण संपलेले असेल. आम्ही ओबीसींना योग्य ती दिशा दिली आहे आणि ते मतपेटीतून दाखवून देतील, असा इशारा हाके यांनी राजकारण्यांना दिला आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. रोहित पवार, राजेश टोपे, तानाजी सावंत, मोनिका राजळे हे आमच्या हिटलिस्टवर असून, त्यांना आम्ही पाडणारच, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
जरांगे यांनी एमएमडी फॉर्म्युला आणला आहे. जरांगे काय मालक समजतात का या लोकांना?, असा सवालही हाके यांनी केला. कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं या याद्या तयार झाल्या आहेत. पत्रकार परिषद घेऊन ४ तारखेनंतर जाहीर करू. जरांगे यांची उमेदवार यादी जाहीर झाली की आमचीही ओबीसी आघाडीची यादी लगेच जाहीर करू, असं हाके यांनी सांगितलं.
जरांगे यांनी एमएमडी फॉर्म्युला आणला आहे. त्यांच्या या फॉर्म्युलाचं काही खरं नाही. जरांगे यांच्या या साऱ्या कवीकल्पना आहेत. निवडणुका होतील. जरांगे नावाचा माणूस इतिहासजमा झालेला असेल. आमची यादी तयार आहे. जरांगे पाटील यांच्या यादीची वाट बघतोय, असेही हाके म्हणाले. वेळप्रसंगी आम्ही महायुतीच्या उमेदवारांनाही राजकीय पाठिंबा जाहीर करू; पण अट एकच असेल, त्यांनी ओबीसी आरक्षण संरक्षणाची हमी द्यावी. त्यासाठी पाहिजे तर आम्हीही स्टॅम्पपेपरवर लिहून मागू, असेही ते म्हणाले.