• Contact Us
  • Home
Monday, December 1, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

आज लक्ष्मीपूजन….

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
November 1, 2024
in सांस्कृतिक
0

नमस्कार…


महालक्ष्मी-कुबेर पूजन….

नमस्कार…!
    
दि.०१|०११|२०२४

*॥ श्रीमहालक्ष्मी – कुबेर पूजन ॥*

🟣 आश्विन अमावस्येला प्रातःकाळी अभ्यंग स्नान करावे.
(कालादर्श)

🟣 सूर्य आणि चंद्र दोघेही “स्वाती” नक्षत्रात असलेल्या दिवशी “पंचकल्क” किंवा “पंचत्वक्” (अश्वत्थ, उंबर, प्लक्ष(पिंपरी), आम्र, वट यांच्या त्वचा (साली) घातलेल्या पाण्याने) सहित  स्नान करणारा व स्त्रियांकडून नीरांजन करवून घेणारा आणि (सायंकाळी) लक्ष्मीपूजन करणारा व्यक्ती *विपुल लक्ष्मी प्राप्त करणारा होतो.*
तसेच हे करणारा व्यक्ती *लक्ष्मी रहित होतच नाही.* भलेही हा दिवस  अमावस्या, संक्रांती, व्यतिपात , रविवार , दिनक्षय इत्यादी दोषांनी युक्त असो.
(पुष्कर पुराण & ब्रह्म पुराण -आश्वयुग् दर्शन & कश्यप संहिता )

🟣 लक्ष्मी पूजन कधी करावे ❓❓या विषयी..
*आपण नित्य वापरत असलेल्या पंचांगानुसार ; आपापल्या गावाच्या सूर्यास्तानंतर २४ मिनिटांपर्यंत अमावस्या ज्या सायंकाळी असेल त्या दिवशी हे पूजनाचे कार्य करावे.*
(काशीस्थ धर्मसभा निर्णय)

🟣 श्रीलक्ष्मी- कुबेर पूजा मुहूर्त:-  १७.५९ ते २०.३०
(सूर्यसिद्धांतीय पंचांगानुसार)

🟣सायंकाळी आचमन-देशकालाचा उच्चार करून;पुढील प्रमाणे संकल्प करावा.
*मम श्रीमहालक्ष्मी प्रीतिद्वारा अलक्ष्मी परिहार पूर्वकं विपुलश्रीप्राप्ति सन्मंगल महैश्वर्य कुलाऽभ्युदय सुख-समृध्याऽदि कल्पोक्त फलसिध्यर्थं श्रीलक्ष्मी पूजनं – कुबेरपूजनं च करिष्ये  ।*

🟣 असा संकल्प करून; आसन विधी,न्यास , कलशपूजा, श्रीगणपती पूजा इत्यादी करावी.

🟣 श्रीलक्ष्मी- कुबेर यांचे आवाहन करून; *॥श्रीलक्ष्मी-कुबेराभ्यां नमः ॥* या मंत्राने ; तसेच अंगपूजा,पत्रपूजा या सह देवीची षोळशोपचार पूजा करावी.
(पूजा पद्धती ग्रंथात विस्तृत असलेने सर्व पूजा टाईप करून पाठविणे समयाऽभावी शक्य होत नाही.)

🟣 या नंतर पुढील मंत्रांनी  देवीची प्रार्थना करावी.

*卐 लक्ष्मी प्रार्थना मंत्र:-*

१} *कमला चपला लक्ष्मी: चलाभूति: हरिप्रिया ।*
*पद्मा पद्मालया संपदुच्चै: श्री: पद्मधारिणी ॥*

२} *नमस्ते सर्व देवानां वरदासि हरिप्रिये । या गतिस्त्वत् प्रपन्नानां सामेभूयात् त्वदर्चनात्  ॥*

३} *या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता ।*
*नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनम:॥*

*卐 श्रीकुबेर प्रार्थना मंत्र:-*

*धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपाय च ।*
*भवंतु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदः ॥*

🟣 या पूजेमध्ये ; लवंग-विलायची- साखरयुक्त गाईच्या दुधाने अथवा तुपाने युक्त लाडू चा नैवेद्य करावा असे आहे.
तथापि गुडमिश्र धान्य, धणे, खडीसाखर, साळीच्या लाह्या, बत्तासे इ.अर्पण करण्याची (शिष्टांची) प्रथा आहे.
(पूजासमुच्चय)

🟣 ब्राह्मणांना उपहार अर्पावा.  *भूयसीदक्षिणा* देऊन सम्मान करावा .

*लक्ष्मी पूजेनंतर बरेच लोक पूजा करणा-या ब्राह्मणांना दक्षिणा देत नाहीत.वास्तविक पाहता हे योग्य नाही. पूजोत्तर दक्षिणा देऊ नये; याला कोणताही शास्त्राधारतर नाहीच; उलटपक्षी (पूजा समाप्ती नंतर) लगेचच  दक्षिणा न देणे (कर्मफलप्राप्तीसाठी) दोषावह आहे.*

*तसेच ; जर दुसरे दिवशी दक्षिणा देणार असाल तर; ती दक्षिणा दुप्पट करून द्यावी लागते.*

*॥ एकरात्री व्यतीतेतु तद्दक्षिणा द्विगुणं भवेत् ॥*
(देवीपुराण)
 
🟣पुराण- प्रवचन- गीतगायन इ. जागरण करावे.
(पूजासमुच्चय)

🟣 *निशीथकाळी अलक्ष्मी निस्सारण करावे.*
(या २०२४ च्या रात्रीचा निशीथकाळ:- मध्यरात्री  ११.५३ ते  १२.४३ पर्यंत आहे.)

🟣 अलक्ष्मी निस्सारणाचा  विधी:-
मध्यरात्री निद्रेने लोकांचे अर्धे डोळे मिटलेले असताना घरातील (सुवासिनी) स्त्रियांनी सूप व डिंडिम (दवंडी) वाजवून मोठ्या आनंदाने आपापल्या घरांतून अंगणातून *”अलक्ष्मी”* बाहेर घालवावी.
(भविष्य पुराण- मदनरत्न)

🟣 प्रत्यक्ष कर्म करण्याची पद्धती येणेप्रमाणे…

अलक्ष्मी निस्सारण करणें  म्हणजे ;लक्ष्मी पूजेच्या वेळी ठेवलेल्या झाडूने घराच्या मागील भिंतीला झाडू लाऊन (म्हणजे मागील भिंतीपासून ) तसाच तो झाडू जमिनीवर लावत घराच्या उंब-या पर्यंत केर झाडत नेऊन ; केर – कचरा (उंब-याच्या) बाहेर झटकून द्यावा.
हे करत असताना ; (हे कचरा बाहेर झटकण्याची) क्रिया करणा-या व्यक्तीने… *॥ अलक्ष्मीं निःसारयामि ॥* असे म्हणत जावे.
आणि तसेच त्या वेळी घरातील महिलांनी (धान्य पाखडण्याचे) सूप मोठ्याने वाजवावे.)

🟣 या अमावस्येला ; बाल अथवा रोगी व्यक्ती सोडता इतरांनी दिवसा भोजन करू नये.
(भविष्य पुराण – हेमाद्री)

( म्हणून फराळाची व्यवस्था केलेली असते.)

*॥ शुभदीपावली ॥*
वे.शा.सं.अमोलशास्त्री जोशी,
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५

श्रीगुरुदेव दत्त …!

——-//–///////——-

*॥ अल्प परिचय आणि आवाहन ॥*

वेदमूर्ती अमोलशास्त्री राजाराम जोशी.

प्रधानअध्यापक तथा सचिव; श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
______________________

🟣 श्रीनृसिंहसरस्वती पाठशाळा, श्रीक्षेत्र देवाचीआळंदी. येथे एक तप (बारा वर्षे) गुरूगृही वेदाध्ययन केले.

🟣 गुरुजींच्या आज्ञेने आणि परिजनांच्या त्यागपूर्ण सहयोगाने गत २२ वर्षांपासून; आजतागायत  श्रुतिगंध वेदपाठशाळा बीड च्या माध्यमातून अविरत वेदाऽध्यापनाचे कार्य चालू आहे.

🟣 अनेक प्रकारच्या वेदपरिक्षा उत्तीर्ण असून अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.

🟣 श्रुतिगंध वेदपाठशाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी भारतातील अनेक मान्यताप्राप्त परीक्षेत उत्तुंग यशप्राप्ती करून;विद्वान झालेले आहेत.

🟣असे विद्वान झालेले  विद्यार्थी देखील ; वेदअध्यापनाचे कार्य करत आहेत.

🟣अनेक वैदिक सम्मेलनांमध्ये
सक्रिय सहभाग.

🟣 समाजातील सर्व वयोगटातील सर्वसमावेशक संस्कृत शिक्षणार्थींसाठी *ऑनलाईन संस्कृत अध्ययनाचे* कार्य चालू झालेले असून;पहिल्या बॅच ची परीक्षा यशस्वीपणे संपन्न झालेली आहे.

🟣 *या श्रुतिगंध वेदपाठशाळेत; वेद  शिक्षण ऑफलाईन तर संस्कृत शिक्षण ऑनलाईन उपलब्ध आहे.*

🟣 *वेदाऽध्ययनासाठी इच्छुक शिक्षणार्थींना अन्न,वस्त्र, निवारा या सोबत च निःशुल्क प्रवेश चालू आहे.*

🟣 *ऑनलाईन संस्कृत शिक्षणार्थींसाठी अत्यल्प मूल्यात सशुल्क अध्ययन उपलब्ध आहे.*

🟣 *इच्छुक शिक्षणार्थींनी ९५११८६९१५५ या क्रमांकावर संपर्क करून; अवश्य लाभ घ्यावा.*

श्रीगुरुदेव दत्त..!

Previous Post

पंत,अय्यर,राहुल करारातून मुक्त; खेळाडूंची लिस्ट जाहीर…

Next Post

उपमुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवली…

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

उपमुख्यमंत्र्यांची सुरक्षा वाढवली...

ताज्या बातम्या

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025
वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

November 17, 2025
आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

November 16, 2025
विधानसभेसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर; ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब

बीड शहरात प्रथमच भाजप ठरू पाहतोय तुल्यबळ पक्ष.

November 16, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.