बीड विधानसभा मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर हे निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाल्या नंतर आता मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे बीडमधून कोणाला उमेदवारी देतात याकडे लक्ष लागले आहे.
बीडची जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला मिळेल असे एकंदर चित्र होते आणि अनिल जगताप शिवसेनेचे उमेदवार असतील असे बोलले जात होते, मात्र काल 11 मराठा उमेदवारांनी एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल केले त्यात अनिल जगताप हेही होते, एवढेच नव्हे तर चार्टर्ड अकाउंटंट बी बी जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना जगताप हे सोबत होते, त्यामुळे अनिल जगताप हे मराठा मराठा क्रांती मोर्चा चे उमेदवार असतील की काय ? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले होते. रात्री सव्वा दोन वाजता बीडची जागा ही अजित पवारांना सुटल्याचे स्पष्ट झाले आणि लगोलग डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी ही जाहीर झाली त्यामुळे आता येथून चौथा उमेदवार कोण ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
. जरांगे पाटलांकडून अनिलदादा जगताप, सीए बी-बी जाधव, रमेश पोकळे , प्राध्यापक सुरेश नवले, गंगाधर काळकुटे , एडवोकेट मंगेश पोकळे, स्वप्निल गलधर हे इच्छुक आहेत. त्यामुळे या सर्व तुल्यवर उमेदवारात एकाची निवड करण्याचा आता जरांगे पाटलांपुढे पेच आहे , ते जो उमेदवार देतील तो उमेदवार बीडमध्ये तुल्यबळ ठरेल हे नक्की.