दि.२९|१०|२०२४
॥ गुरुद्वादशी ॥
॥ धनत्रयोदशी ॥
🟣 “गुरुद्वादशी” हा दिवस श्रीपाद श्रीवल्लभांचा निजानंदी गमन दिवस आहे.
🟣 या दिवशी श्रीगुरु दत्तात्रेयांचे पूजन करावे.
🟣 याचा संकल्प:- आचमनादी देशकाल कीर्तनांऽते सपरिवारस्य मम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धये श्रीपाद श्रीवल्लभ श्रीगुरु दत्तात्रेयरूपी श्रीसद्गुरु प्रीत्यर्थं षोळशोपचारैः पूजनं करिष्ये ।
असा संकल्प करून; गणेशपूजा, न्यास , कलशपूजा, करावी.
पुढील मंत्रांनी देवाचे ध्यान करावे..
🟣ध्यान मंत्र:-
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्ष्यं । एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुण रहितं सद्गुरुं तं नमामि ॥
काषायवस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्म करेणशंखं । चक्रं गदा भूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
या दोन मंत्रांनी देवाचे ध्यान करून; षोळशोपचार पूजा करावी.
🟣 सांगता सिद्ध्यर्थ ब्राह्मण भोजन घालावे.
पुराणश्रवण करत रात्र व्यतीत करावी.
🟣 या दिवशी धन्वंतरि देवतेची उत्पत्ती झाली करिता; हा दिवस धन्वंतरि जयंती म्हणून प्रसिद्ध आहे.
🟣 या दिवशी निरोगी दीर्घायुष्य मिळविण्यासाठी धन्वंतरि देवतेची ची पूजा करतात.
🟣काही ठिकाणी वैद्य (डॉक्टर) लोक आपल्याकडे येणा-या रुग्णांना नित्य आरोग्य मिळावे या कामनेने “दैवी उपचार” म्हणून “धन्वंतरि याग “ नामक “यज्ञ” करतात.
(आपल्या कडे “धन्वंतरि यागाचे” विधान आहे. )
🟣 या दिवशी काही जणांकडे प्रथेनुसार सुवर्ण तसेच स्वयंपाकाची नवीन भांडी विकत आणून त्यात धणे भरून त्याचे पूजन करून;दुस-या दिवशी पासून ती वापरात घेण्याची प्रथा आहे.
🟣सायंकाळी संध्यावंदनादी झाल्यावर; घरात कोणासही अपमृत्यु येऊ नये म्हणून गव्हाच्या पिठात हळद टाकून केलेला दिवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे ज्योत करून प्रज्वलीत करावा. त्या नंतर; तो दीप यमदेवतेस संकल्प पूर्वक श्रद्धेने अर्पण करावा.म्हणजे; पुढील एक वर्षात आपल्या घरात कोणासही असमयी “अपमृत्यु” येत नाही अशी मान्यता आहे.
या दीप दानाचा विधी..
🟣 संकल्प:-
देशकालौ संकीर्त्य मम अपमृत्यु विनाशार्थं यमदीप दानं करिष्ये ।
असा संकल्प करून; दिव्याचे मुख दक्षिणेकडे करून; त्या दिव्यात तिळाचे तेल घालावे.
गंध-अक्षदा-पुष्प इत्यादींनी तो दिवा पूजनाने सुशोभित करत पुढील मंत्राने तो दीप यमदेवतेस अर्पण करावा.
🟣 मंत्र :-
मृत्युना पाशदंडाभ्यां
कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यां दीप दानात् सूर्यजः प्रीयतां मम ॥
🟣 अनेन दीप दानेन श्रीयमः प्रीयतां !
इति.. आश्विन कृष्ण त्रयोदश्यां यमदीपदान विधिः ।
🟣 अशाप्रकारे हा दीपदान विधी नरकचतुर्दशीला देखील करावा.
🟣 या वर्षी ; या दिवशी “भौमप्रदोष” आहे.
हे “भौमप्रदोषाचे” व्रत केले असतां कर्जनिवृत्ती होते.
वे.शा.सं.अमोलशास्त्री जोशी
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त..!