

बीड विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादीचे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर केली आहे .

शिंदे यांची शिवसेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी यांच्यात या जागेवरून मोठी रस्सीखेच झाली आणि अखेर अजित पवारांनी ही जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून सोडवून घेतली. कालच डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला,
त्याआधी त्यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले, त्यात आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा आत्मविश्वास त्यांनी प्रगट केला होता तो अखेर खरा ठरला. विशेष म्हणजे आता बीड विधानसभा मतदारसंघात 3 क्षीरसागर निवडणूक रिंगणात उतरले असून या तिघातही तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. आता चौथा उमेदवार कोण ? य याकडे लक्ष लागले आहे.






