भाजपाने आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस कडून सोडवून घेतला असून येथे भाजपा तर्फे विद्यमान विधानपरिषद आमदार सुरेश धस यांना उमेदवारी दिली असल्याची माहिती सूत्रांनी सांगितले आहे तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे आष्टी विधानसभा मतदारसंघातील रहिवासी राम सातपुते यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचेही समजते आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघ हा सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे ,येथील आमदार बाळासाहेब आजबे यांनी मध्यंतरीच्या सत्तांतरात अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता ही जागा राष्ट्रवादीला सुटेल अशी त्यांची अपेक्षा होती मात्र गेवराई ची जागा भाजपाने अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोडली तर त्या बदल्यात आष्टीची जागा भाजपाने आपल्याकडे घेत आमदार सुरेश धस यांचे नाव निश्चित केले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर आता विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे काय निर्णय घेतात याकडे या मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.आता अष्टीत राष्ट्रवादी (शरद पवार)चे महेबूब शेख विरुद्ध सुरेश धस यांच्यात लढत होत आहे .
माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून त्यांना भाजपाने गेल्या निवडणुकीत संधी दिली होती आणि ते निवडून आले होते आता ते पुन्हा एकदा माळशिरसमध्ये नशीब आजमावणार आहेत.