बीड-
गेल्या दोन विधानसभा निवडणुकी पंडितांनी हातातून गमावलेली गेवराई पुन्हा एकदा आपल्याच ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पंडितांच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत .काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या हाती मशाल दिली तर आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने युवा नेते विजयसिंह पंडित यांना उमेदवारी जाहीर केली आहे .विशेष म्हणजे हा मतदारसंघ गेल्या दोन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या लक्ष्मणराव पवार यांनी राखला होता या निवडणुकीत ते भाजपाकडून न लढता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ महाआघाडीत आणि महायुतीत कोणता पक्ष लढवणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे .आष्टी मतदार संघाच्या बदल्यात गेवराई मतदार संघ भारतीय जनता पक्षाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडल्याचे चित्र दिसत आहे .आष्टीतून भाजपाकडून विद्यमान आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांना उमेदवारी मिळावी यासाठी सुरेश धस यांचे प्रयत्न करीत आहेत, तर माजी आमदार भीमराव धोंडे हे सुद्धा भाजपकडून प्रयत्नशील आहेत , विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांचे तिकीट अजित पवार कापणार असल्याचेही एव्हाना स्पष्ट झाले आहे, या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दुसरी यादी जाहीर झाली आहे त्यात गेवराईतून विजयसिंह पंडित तर लोहा कंधार येथून प्रताप पाटील चिखलीकर यांची नावे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी
शिरुर – ज्ञानेश्वर कटके
तासगाव – संजयकाका पाटील
इस्लामपूर- निशिकांत पाटील
अणुशक्तीनगर- सना मलिक
वांद्रे पूर्व- झिशान सिद्दिकी
वडगाव शेरी – सुनील टिंगरे
लोहा-कंधार- प्रतापराव चिखलीकर
गेवराई- विजयसिंह पंडित