
बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)चे योगेश दामले यांची नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे महामंडळ स्थापित व्हावे म्हणून उभारलेल्या ब्राम्हण समाजाच्या विविध आंदोलनात योगेश दामले फारसे सक्रिय नव्हते,दामलेंच्या नियुक्तीमुळे ब्राम्हण समाजात आश्चर्य व्यक्त होत आहे.
ब्राम्हण समाजातील तरुणांना उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे म्हणून विविध ब्राम्हण संघटनांनी आंदोलन छेडले होते तर काहींनी आमरण उपोषण देखील केले होते, यात सक्रिय सहभाग असणारा कुणी अध्यक्ष होईल अशी अपेक्षा होती,ज्यात बाजीराव धर्माधिकारी, सुरेश मुळे, दीपक रणवरे, विश्वजित देशपांडे, प्रकाशमहाराज केदारे यांचे प्रामुख्याने नाव घेतले जात होते, विशेषतः मराठवाड्यात व्यापक आंदोलन उभे राहिले होते म्हणून अध्यक्ष पण मराठवाडा विभागातून होईल असे वाटले होते पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावल्यामुळे ब्राम्हण समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.