हरियाणा विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपात उत्साह संचारला असून महाराष्ट्रात देखील पुन्हा महायुतीचे सरकार येईल असा विश्वास पल्लवित झाला आहे. पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी भाजप नेत्यांकडून खास रणनीती आखण्यात आली आहे.यापूर्वी प्रभावी ठरलेला माधव पॅटर्न भाजपा राबवणार आहे. भाजपचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्राच्या नियोजनात सध्या व्यस्त आहे.
काय आहे माधव
भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी खास माधव प्लान आखल्याचं समोर येत आहे. भाजपने ओबीसींवप लक्ष केंद्रित केलं. ज्यामध्ये माळी(मा), धनगर (ध) आणि वंजारी (व) समाजाच्या लोकांना जवळमाधव फॉर्म्युला मजबूत करण्यासाठी सरकारने कांदा निर्यात शुल्क कमी केले. पंतप्रधान मोदींनी नुकतेच बंजारा हेरिटेज म्युझियमचेही उद्घाटन केलंय.धनगड जातीचे प्रमाणपत्र रद्द करून धनगरांच्या मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने एक पाऊल भाजपने पुढे टाकले आहे, याशिवाय मराठा समाजाला आपल्याकडे कसे आकर्षित करता येईल यासाठी मराठा नेत्यांना मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या होत्या. तब्बल 14 जागांचा फटका बसला होता. अजित पवार यांच्या पक्षाशी युती करूनही भाजपला फायदा झाला नसल्याचं भाजपच्याच नेत्यांनी म्हटलं होतं. मराठा आंदोलनामुळे मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केल्याने त्याचा ही फटका भाजपला बसला होता. भाजपला मराठवाड्यात एकही जागा मिळाली नाही. पश्चिम महाराष्ट्रात फक्त दोन जागा मिळाल्या. आता जर माळी, धनगर, वंजारी या पारंपारिक मतदारांनी जर भाजपला साथ दिली तर राजकारणात माधव’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जातीतील शेतकरी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक आहेत. कांद्याच्या भावामुळे शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.
भाजपचा हा माधव फॉर्म्युला भाजपला विधानसभा निवडणुकीत फायदा करुन देऊ शकतो. जर हे तीन समाजाचे मतदार भाजपकडे गेले तर भाजपला मराठवाड्यात 46 आणि पश्चिम महाराष्ट्रात 70 जागा मिळू शकतात. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात 39 जागा लढवून 16 जागा जिंकल्या होत्या. तर पश्चिम महाराष्ट्रातील 26 जागांवर निवडणूक लढवून 16 जागा जिंकल्या होत्या. महायुती सरकारने अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर केले. अहिल्यादेवी होळकर हे धनगर समाजाचे अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व होते. आजही धनगर समाज त्यांची देवीप्रमाणे पूजा करतात. महायुती सरकारने ब्राह्मण आणि राजपूतराजपूत समाजाच्या आर्थिक विकासासाठी दोन महामंडळे स्थापन करण्याची घोषणा केली.
लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात देखील मोठा फटका बसला. पण विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला होता. तेथेही पराभव स्वीकारावाल लागला. विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. जो विदर्भ जिंकतो तो मुख्यमंत्रीपदापर्यंत जातो असं म्हटलं जातं. नागपूर हा विदर्भाचा भाग आहे, जिथून देवेंद्र फडणवीस विधानसभेची जागा लढवतात.
विदर्भात दलित मतदारांची संख्या ही जास्त आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार संविधान बदलणार असा प्रचार केल्याने काँग्रेसला मोठा फायदा झाला. पण आता दलित मतदारांना भाजप कसे आकर्षित करते हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. मराठा कुणबींना ओबीसी जातीचे प्रमाणपत्र देऊन खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.