परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि अन्य नव्या आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळासाठी आपली वर्णी लागेल असे वाटणाऱ्या इच्छुकांच्या पदरी तूर्त निराशा पडणार आहे.
महायुती सरकारने विविध समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापण्याचा निर्णय घेतला असून त्याचा शासनादेश देखील काढला आहे. यात ब्राम्हण,आर्य वैश्य,लोणारी,हिंदू खाटीक ,जैन धर्म आदी समाजघटकांचा समावेश केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर या आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आहे. याबाबतच्या पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार आहे, मात्र त्याआधीच या महामंडळावर नियुक्ती साठी आणि त्याचा लाभ मिळण्याची लोकांना घाई झाली आहे.
आचारसंहिता लागण्याआधी परशुराम आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष व अशासकीय महामंडळ सदस्य नियुक्त होतील म्हणून अनेक ब्राम्हण समाज बांधव इच्छुक होते मात्र
निवडणूक संपल्यावर, नवीन सरकार स्थापन झाल्यावर संचालक मंडळाच्या नियुक्त्यांचा निर्णय होणार असल्याचे समोर आले आहे. हे सोपस्कार पूर्ण झाल्या नंतरच पात्र लाभार्थ्यांना या महामंडळाचा लाभ मिळेल.
कर्ज मिळवून देतो म्हणून दिशाभूल.
मात्र याआधीच महामंडळाच्या नावाखाली काही जन समाज बांधवांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत ज्यात महामंडळातून कर्ज मिळून देतो म्हणून. (वैयक्तिक माहिती) नाव नोंदणी करण्यासाठी कागदपत्र जमा करणे, अशा गोष्टी केल्या जात आहेत. महामंडळाची सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असते म्हणून ऑफलाइन कागदपत्र कोणाकडेही जमा करायची आवश्यकता नसते अशी दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून सावध रहावे असे आवाहन विविध ब्राम्हण संघटनांनी केले आहे.