पुणे शहरातील एका पब मध्ये अल्पवयीन आरोपींनी मद्याचे सेवन केले आणि त्यानंतर पोर्श कांड घडले ज्यामुळे राज्यातली सर्व यंत्रणा कारवाईच्या भूमिकेत उतरली. बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक लोकसेवक अविनाश बारगळ यांच्या विशेष पथकाने मागील महिन्यात बीड शहर, ग्रामीण आणि पेठ बीड भागात चालणाऱ्या अवैध दारूच्या गुत्यांवर, बेकायदेशीर दारू विक्रीवर धडक कारवाई केली आणि स्वतःचा धाक बसविला. परंतु दारू/मद्य विषयी संबंधित असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला याबाबतीत कारवाई करण्याचा अधिकार असताना सदरील विभागाचे अधीक्षक लोकसेवक विश्वजीत देशमुख यांनी आजपर्यंत कर्तव्यात कसूर केल्याची प्रवृत्ती प्रथमदर्शनी निदर्शनास आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना माहिती अधिकार कार्यकर्ते ऍड. शार्दुल देशपांडे यांनी सांगितले की राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख कार्यच हे अवैध दारू विक्री, परमिट रूमचा अनाधिकृत वापर-खटला दाखल करणे, बियर शॉपीची नियमित तपासणी, निरीक्षक यांच्याद्वारे ते सर्व अनुज्ञपत्या यांची तपासणी-खटला-दंड, परवाना रद्द करणे असे आहे. परंतु सदरील कार्यालयाचे अधीक्षक लोकसेवक विश्वजीत देशमुख यांनी आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांनी याबाबतीत कोणतीही भरीव कामगिरी केल्यात केली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. बीड जिल्ह्यामध्ये बिअर शॉपी परमिट रूम यांना परवानगी देणे म्हणजे स्वतःचे नियमित कर्तव्य बजावणे असा अर्थ नसून बेकायदेशीर सुरू असलेली दारू विक्री अल्पवयीन युवकांना विक्री होत असलेली बियर, हार्ड लिकर या सर्व दुकानांवर कारवाई करणे, त्यांच्यावर खटला दाखल करणे आणि त्यांचे परवाने रद्द करणे हा सुद्धा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे परंतु लोकसेवक देशमुख यांच्याकडून सदरील बाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसत आहे.
नेमून दिलेले कर्तव्य पार पाडण्यास कसूर केल्याबाबत लोकसेवक देशमुख आणि इतर कर्मचारी यांच्या विरोधात लोकसेवक डॉक्टर विजय सूर्यवंशी आयुक्त, लोकसेवक संगीता दरेकर उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते ऍड. शार्दुल देशपांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.