
मुंबई/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मूळचे रहिवाशी तथा पुणे येथील कॅडमॅक इंजिनिअरिंग प्रा लि चे उद्योजक तथा लेखक प्रकाश आत्माराम सुलाखे यांना डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृती पुरस्कार २०२५ या प्रतिष्ठित पुरस्कार सन्मान सोहळ्यात गेस्ट ऑफ ऑनर म्हणून गौरविण्यात आले आहे,तसेच कॅडमॅक इ इंजिनिअरिंग प्रा लि या कंपनीला प्रथम पुरस्कार टॉप ब्रँड इन इंजिनिअरिंग एज्युकेशनल लॅब इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर म्हणून देण्यात आला आहे,टॉपनॉच फाउंडेशन आयोजित या कार्यक्रमाला अनेक मान्यवर व्यक्तींनी उपस्थिती लावली होती.
या सोहळ्यात प्रकाश सुलाखे यांच्यासोबत प्रसिद्ध अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद,खा तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे, तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकर,फाऊंडेशनचे सीईओ करूनसिंग व पदाधिकारी उपस्थित होते
या पुरस्कार सोहळ्यात भारतभरातील विविध प्रतिष्ठित उद्योजकांना सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले उद्योजक आणि लेखक प्रकाश आत्माराम सुलाखे यांच्या दुसऱ्या पुस्तकाचे “Engineering Education: Pain or Gain” या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई येथील प्रसिद्ध हॉटेल ताज येथे एका भव्य आणि प्रतिष्ठित समारंभात झाले. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे आणि प्रसिद्ध अभिनेता व समाजसेवक सोनू सूद,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,फाऊंडेशनचे सीईओ करून सिंग,यांच्या उपस्थितीमुळे या क्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
भारतातील अभियांत्रिकी शिक्षणातील आव्हाने आणि भविष्यातील संधी यावर आधारित हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि धोरणकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.तांत्रिक शिक्षणाच्या नवविचार आणि परिवर्तनासाठी प्रकाश सुलाखे यांचा हा प्रयत्न एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.इंजिनिअरिंग क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके अभ्यासपूर्ण असणार आहेत,यापूर्वी देखील सुलाखे यांना पणजी येथे गोव्याचे मुख्यमंत्री,प्रसिद्ध अभिनेत्री खा हेमा मालिनी यांच्या हस्ते बेस्ट उद्योजक म्हणून गौरविण्यात आले होते,त्यांच्या या यशाचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर,प्रसिद्ध विधिज्ञ कालिदास थिगळे,लोकप्रश्नचे संपादक दिलीप खिस्ती,जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे,प्रमोद कुलकर्णी,विकास उमापूरकर,मिलिंद सुंदर,उदय जोशी,दीपक सर्वज्ञ,दिव्यअग्नी चे संपादक प्रकाश सुर्यकर,कार्यकारी अभियंता शिवप्रसाद खेडकर,दिनकर कदम,विलास बडगे,अरुण डाके,नानासाहेब काकडे,गणपत डोईफोडे, गंगाधर घुमरे,गिरीश देशपांडे,साहस अदोडे,यांच्यासह बीड येथील पत्रकार आणि मित्र परिवाराने कौतुक केले आहे,लोकांक्षाचे संपादक तथा माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पीआरओ प्रशांत सुलाखे यांचे ते लहान बंधू आहेत