
केज (प्रतिनिधी )अवादा एनर्जी या कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड ला केज न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीआयडी ने वाढीव दहा दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र आरोपीच्या वकिलाने तपास पूर्ण झाल्याने वाढीव कोठडीची गरज नाही अशी माहिती दिली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला.
वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल सरकारी वकिलांनी कोर्टाला अवगत केलं. वाल्मिकची मोठ्या प्रमाणावर संपत्ती असल्याची माहिती मिळत असून ही संपत्ती भारताबाहेरही असू शकते, असा युक्तिवाद करण्यात आला. त्यामुळे त्याला खंडणीच्या प्रकरणात आणखी १० दिवस सीआयडी कोठडी मागण्यात आलेली आहे.
सरकारी वकील शिंदे हे सरकारी पक्षाची बाजू मांडत आहेत. तर सिद्धेश्वर ठोंबरे हे वाल्मिक कराडची बाजू केज कोर्टामध्ये मांडत आहेत. सरकारी पक्षाच्या वतीने दहा दिवसांची कोठडी मागितल्याचं मीडिया रिपोर्टनुसार कळतंय. यापूर्वी वाल्मिकला १४ दिवसांची कोठडी मिळाली होती. दरम्यान, १२ डिसेंबर २०२४ पासून फरार असेलला वाल्मिक ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण आला. त्यानंतर त्याला फरार होण्यासाठी मदत करण्यांची चौकशी करण्यीच मागणी होत आहे. एवढंच नाही तर खुद्द धनंजय मुंडेंच्या बंगल्या पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर वाल्मिक फरार झाला, आसा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला आहे.
खंडणीच्या प्रकरणात सीआयडीने वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. ते नमुने आवादा कंपनीचे सुपरवायझर शिंदे यांच्या आवाजाशी मिळतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. कारण शिंदेंच्या मोबाईलमधून मोबाईल कॉल डेटा सीआयडीला मिळालेला आहे. मात्र विष्णू चाटेचा मोबाईल अखेर सीआयडीला मिळालाच नाही. शेवटी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी मिळाली.
न्यायालयात सुनावणीला सुरुवात होताच तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडची दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितली. व्हाईस सॅम्पल घेतला गेला आहे. तीन मोबाईल वाल्मीक कराड यांचे जप्त केले आहेत. संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली आहे का हे तपासायचे म्हणून पीसीआर हवा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले. भारतात अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का?, याचा तपास करायचा आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले.
आरोपी वाल्मिक कराडच्या वकीलाचस न्यायालयात युक्तिवाद …
आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले की, 15 दिवसांपासून वाल्मिक कराड पोलिसाच्या ताब्यात आहे. आणखी कोणता तपास बाकी आहे. बँक खात्याची चौकशी कऱण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यासाठी आरोपीची गरज नाही. यापूर्वीचे त्यांच्याविरोधातले 14 गुन्हे नील झाले आहेत. मग त्या गुन्ह्यांचा तपास का करायचा आहे?, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची एकत्र चौकशी करायची होती, तर मग दोन्ही आरोपी 10 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहे मग तेव्हा का नाही केली?, हा सगळा तपास 15 दिवसांपुर्वी करणार होतात. मग 15 दिवसांत काय तपास केला?, असा युक्तिवाद वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी केला. तसेच वाल्मिक कराड तपासात सहकार्य करत नाही असं तुमचं म्हणणं असेल तर 15 दिवसांत त्यांनी काय सहकार्य केलं नाही ते आम्हाला सांगा…आता पोलीस कोठडीची गरज नाही, असंही सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले.
विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेशी काही संबंध नाही- सिद्धेश्वर ठोंबरे
मीडिया ट्रायलमुळे वाल्मिक कराड यांच नाव या गुन्ह्यात घेण्यात आलं आहे. खंडणीच्या तक्रारीत कराड यांच्याशी परळीत ऑफिसमध्ये खंडणीची मागणी झाली असा आहे. पण वेळ आणि कोणत्या दिवशी खंडणी मागितली त्याचा उल्लेख नाही. कराड यांचा विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेशी काही संबंध नाही. आरोपीने 15 दिवस कोठडी भोगली आहे. नवीन कस्टडीची गरज नाही, असं सिद्धेश्वर ठोंबरे यांनी न्यायालयात सांगितले.
कराडच्या आईचे ठिय्या आंदोलन..
वाल्मीक कराड यांच्या आईने आज सकाळपासून परळी स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर परळीमध्ये कराड समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत टॉवरवर चढून आंदोलन केले. एकीकडे वाल्मीक कराडला घेऊन सीआयडी न्यायालयात गेली असतानाच दुसरीकडे परळीमध्ये नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले.
परळीमध्ये कराड समर्थकांनी टॉवरवर चढत आंदोलन केले. आक्रमक झालेल्या समर्थकांनी टायरही पेटवले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत टायर विझवले, त्याशिवाय गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. टॉवरवर चढत आंदोलन करताना कराड समर्थकांमधील एक आंदोलक बेशुद्ध पडल्याचे दिसले. वाल्मीक कराड यांच्या आईने परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिल्यानंतर, आता पोलीस ठाण्यासमोर हजारोंच्या संख्येने जमाव जमा झाला आहे. त्यांच्याकडून आंदोलन केले जात आहे. त्यामुळे परळमीमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे.