• Contact Us
  • Home
Wednesday, November 26, 2025
  • Login
Ugavatiche Rang
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us
No Result
View All Result
No Result
View All Result

मकर संक्रांती ॥

महेश माधवराव वाघमारे by महेश माधवराव वाघमारे
January 13, 2025
in ऑनलाईन वृत्तसेवा, सांस्कृतिक
0

दि.१४/१/२०२५

🟣 शके १९४६ पौष कृ.१ मंगळवारी पुनर्वसु नक्षत्रावर विष्कंभ योग बालव करणावर मकर लग्नावर सकाळी ०८.२० वाजता सूर्याचे मकर संक्रमण होत आहे.
ही संक्रांत बसलेली असून कुमारी आहे. पिवळे वस्त्र परिधान केलेले असून ती पायस भक्षण करीत आहे. कपाळी कुंकुम तिलक लावलेला आहे. वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. हातात गदा हे शस्त्र धारण केलेले आहे. वासा करिता चमेलीचे फूल धारण केलेले आहे. संक्रांत वायव्येकडे पहात असून पूर्वेकडे जात आहे. तिचे मुख दक्षिणेकडे आहे. नक्षत्र आणि वार नांव  महोदरी आहे.

🟣 मकर संक्रांतीचे जन्मनक्षत्रानुसार फळ..
१} आर्द्रा पुनर्वसु पुष्य- *प्रवास*
२} आश्लेषा मघा पूर्वा उत्तरा हस्त चित्रा – *सुख*
३} स्वाती विशाखा अनुराधा  – *शरीरपीडा*
४} ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा- *वस्त्रलाभ*
५} शततारका पूर्वाभाद्रपदा उत्तराभाद्रपदा- *द्रव्यनाश*
६} रेवती अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी मृग- *धनप्राप्ती*

🟣 मकर संक्रमणाचा पुण्यकाल; सूर्योदयापासून म्हणजे ०८.२० पासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे १८.१३ पर्यंत आहे.

🟣त्यात ही सकाळी  ०८.२० ते १०.२० हे दोन तास ; स्नान , दान इत्यादींसाठी विशेष फलदायी आहेत.
सूर्यसंक्रांती झाली असतां जो मनुष्य स्नान करत नाही तो सात जन्म पर्यंत रोगी आणि निर्धन होतो.
(धर्मसिंधू)

🟣 या दिवशी पासून *उत्तरायण* चालू होते.

🟣 देवांचा दिवस आणि दैत्यांची रात्र चालू होते.

🟣 मकर संक्रमणापासून पुढे महिनाभर रोज प्रातःस्नानाचा नियम करावा.

🟣 या दिवशी काळ्या तिळाचे उटणे लाऊन,  स्नानाच्या पाण्यात एक चमचा काळे तीळ टाकून थंड पाण्याने स्नान करावे.
(शिवरहस्य)

🟣 शिवालयात तिळाच्या तेलाचे दिवे लावावेत तसेच; महादेवाला तुपाने अभिषेक केल्यास विशेष फलप्राप्ती होते. (शिवरहस्य)

🟣 पितरांच्या तृप्ती करिता; पिंड रहित श्राद्ध करावे. (कालिका पुराण – कल्पतरू)

🟣 या दिवशी वस्त्र दानाचे विशेष फळ आहे.
(विष्णुधर्म)

🟣 धातूच्या एका पात्रात तीळ आणि एका पात्रात तांदुळाची खीर भरून ते पात्र दक्षिणेसह ब्राह्मणास दान दिल्यास मनःशांती प्राप्त होते.
(ज्योतिष ग्रंथ)

🟣 *संक्रांतीला ही 👇 कर्मे चुकूनही करूं नयेत..*

१} गरम पाण्याने स्नान
२} तेलात तळलेले पदार्थ खाणे
३} गायीची धार काढणे
४} विवाह संबंधी कार्य
५} स्त्रीसंग
६} कठोर संभाषण
७} गवत- वृक्ष तोडणे.  इत्यादी गोष्टी वर्ज्य कराव्यात.
(ज्योतिष ग्रंथ)

🟣 *संक्रांतीला ही 👇कर्मे आवर्जून करावीत..*
१} तिलोद्वर्तन (तिळाचे उटणे अंगास लावणे)
२} (तिळाच्या पाण्याने)  स्नान
३} तिळदान
४} तिळहोम
५} तिळाच्या पाण्याने (पितरांचे) तर्पण
६} तिळभक्षण या सहा प्रकारे तिळाचा उपयोग केल्यास अनेक पापांचा नाश होईल.
(ज्योतिष ग्रंथ)

🟣 या दिवशी (सुवासिनी) स्त्रियांनी करावयाच्या (आवा लुटणे) दानाचा संकल्प पुढील प्रमाणे..
*मम श्री सवितृ प्रीतिद्वारा  समस्त पापक्षय पूर्वकं  इह जन्मनि जन्मांतरेच स्थिर सौभाग्य कुलाऽभिवृद्धि धन-धान्य समृद्धी दीर्घायु:पुष्टि महदैश्वर्य मंगल अभ्युदय सुख संपदादि कल्पोक्त फलसिध्यर्थं अस्मिन् मकर संक्रमण पुण्यपर्व काले ब्राह्मणाय  तथाच नाना नाम गोत्रेभ्यः सुवासिन्याः यथाशक्ती तिलगुड* ( अथवा जे काही दान करावयाचे आहे; त्याचा उल्लेख करावा. जसे की; वस्त्र, पात्र, धान्य, दधिमथन, धान्य कुटणे चे पात्र,साडी चोळी, सुघट (सुघडे), हळदी, आरसे, चांदीचा दिवा, नारळ-सुपारी, आधाणाचा भात, गूळ-केशर, थाळी, धान्य घट , पुष्टफळं,फळात सुवर्ण मणी घालून दान करणे,स्वयंपाकाची भांडी धान्यभरून, ऊसाची मोळी, लोणी-गूळ -वस्त्र , तिळाचे पीठ-गूळ,नारळ दान,गूळ ढेप, तांब्याच्या पात्रात तिळ भरून दान करणे , कांस्य पात्रात तूप भरून सूर्याचे प्रतिबिंब दान करणें इत्यादी अनेक जी दाने करणार आहोत ती या ठिकाणी उच्चारून )
*दानं अहं करिष्ये ।*

असा संकल्प करून; दानांची पूजा करावी आणि नंतर सूर्यनारायणांची प्रार्थना करून दाने द्यावी.

*विशेष:- उपरोक्त दानामध्ये कुठेही प्लास्टीक इत्यादी वस्तूंचा उल्लेख नसल्याने कोणत्याही प्लास्टीक सारख्या निषिध्द प्रकारच्या वस्तू दान करणे टाळावे.*

🟣 या दिवशी सत्पात्राला संकल्प पूर्वक सुवर्ण सहित    “तिलपात्र” दान करणा-यांस  *” शोकप्राप्ती “* होत नाही.
(कालिका पुराण- कल्पतरू)

याचा संकल्प:-
*मम वाक् मनः कायज त्रिविध पापनाशपूर्वकं ब्रह्मलोक प्राप्तिकामः तिलपात्र दानं करिष्ये।*

असा संकल्प करून; तांब्याच्या पात्रात तिळ भरून त्यात सुवर्णाचा मणी घालून सत्पात्री ब्राह्मणांस पूजन करून खालील मंत्राने  दान करावे. 

दानमंत्र:- *देवदेव जगन्नाथ वांछितार्थ फलप्रद। तिलपात्रं प्रदास्यामि तवांगे संस्थितोहि अहम् ॥*
*तिलाः पुण्याः पवित्राश्च सर्व पापहरा: स्मृता: । शुक्लाश्चैव तथा कृष्णा विष्णुगात्र समुद्भवाः ॥*
*यानि कानिच पापानि ब्रह्महत्या समानि च । तिलपात्र प्रदानेन तानि नश्यंतु मे सदा  ॥*
*इदं तिलपात्रं यथाशक्ती दक्षिणा सहितं सूर्य दैवत्यं ब्रह्मलोक प्राप्तिकामः तुभ्यं अहं संप्रददे* नमम

या प्रकारे दान करून ते श्रीकृष्णार्णमस्तु..
असे म्हणावे.

🟣 या दिवशी “तिलमय धेनूचे” दान केल्यास सर्व कामांची प्राप्ती होऊन परमसुख पावते.
( स्कंदपुराण- हेमाद्री)

🟣 या संक्रांती चे ठायी; देवता आणि पितरांच्या उद्देशाने जी दाने करणार त्या सर्व वस्तू; सूर्यनारायण – दात्याला (दान करणारास) प्रत्येक जन्मात पुनःपुन्हा  देत असतो.
(धर्मसिंधू)

श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५

श्रीगुरुदेव दत्त…!

Previous Post

बीसीसीआयच्या सचिवपदी देवजीत सैकिया…

Next Post

अमित शहा हे आधुनिक भारताचे चाणक्य-देवेंद्र फडणवीस

महेश माधवराव वाघमारे

महेश माधवराव वाघमारे

महेश वाघमारे, बीड

Next Post

अमित शहा हे आधुनिक भारताचे चाणक्य-देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

युट्युब चॅनेलला न प निवडणुकीत मतदान केंद्रावर प्रवेश नाही.

November 26, 2025
पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

पीएनजी ज्वेलर्स’तर्फे नव्या पिढीच्या वधूसाठी ‘प्रथा’ संग्रह सादर

November 18, 2025
स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

स्मिता विष्णू वाघमारे एकमेव अनुभवी उमेदवार.

November 17, 2025
वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

वेळेवर निर्णय न घेतल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांची पांगापांग.

November 17, 2025
आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

आता भाजपातही क्षीरसागर:फडणवीसांनी केले स्वागत.

November 16, 2025
विधानसभेसाठीची भाजपची पहिली यादी जाहीर; ‘या’ नावांवर शिक्कामोर्तब

बीड शहरात प्रथमच भाजप ठरू पाहतोय तुल्यबळ पक्ष.

November 16, 2025

  • Contact Us
  • Home

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • Contact Us

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.