
आपण जर सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर हि आपल्यासाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे, तरुणांसाठी भारतीय टपाल विभागामध्ये (पोस्ट विभागात) नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.भारतीय पोस्ट ऑफिसने ग्रामीण डाक सेवक (Post GDS Bharti 2025) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या एकूण 25,200 पदांची भरती केली जाईल. या भरतीची सर्वात खास गोष्ट म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारावर केली जाईल.
या पदासाठी इच्छुक उमेदवार 3 मार्च 2025 पासून indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीची शेवटची तारीख 28 मार्च 2025 आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल, तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच सरकारी आरक्षण नियमांनुसार, अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सवलत दिली जाईल, ओबीसी वर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सवलत आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षांची सवलत मिळेल. या संदर्भातील अधिकृत PDF जाहिरात लवकरच प्रकाशित होणार आहे.
या फॉर्मसाठी General/OBC/EWS उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे. तर SC/ST/महिला/PwD उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 10,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल, आणि अनुभवाच्या आधारे वेतन वाढू शकते. अतिरिक्त भत्ते वेगळे दिले जातीलया भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ मार्च अपक्षीत आहे.