मुंबई: मागील चार-पाच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली होती. दारावरील नावाची पाटी, दालनाबाहेरील कुंड्यांचीही नासधूस केली होती. याप्रकारानंतर मंत्रालयातील सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. मंत्रालयात एवढी मोठी सुरक्षा व्यवस्था असतानाही ही महिला मंत्रालयात कशी आली, नासधूस करून ती महिला पसार कशी झाली, असे अनेक सवाल उपस्थित होऊ लागले होते. याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
मंत्रालयातील गेटवर संबंधित महिलेची चौकशी करण्यात आली नाही, तसेच तिला अडवण्यातही आले नसल्याचे तपासात समोर आले आहे.त्यामुळे या पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर मंत्रालयाच्या गेटवरील हवालदार अनिल आवळे यांना निलंबित करण्यात आले आहे. बेशिस्त आणि बेजबाबदारीचा ठपका ठेवून आवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात तपास केल्यानंतर संबंधित महिला ही दादरमधील रहिवासी असल्याचे समोर आले. पण मंत्रालयासारख्या ठिकाणी ही महिला प्रवेशाशिवाय कशी आली, ती येत असताना गेटवर तिची चौकशी का झाली नाही. तिला अडवण्यात का आले नाही.
काय घडलं होतं त्या दिवशी?
मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर गृहमंत्री फडणवीस यांचं कार्यालय आहे. गुरूवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे मंत्रालयात फारशी गर्दीही नव्हती. तसेच, कर्मचारीही नव्हते. कर्मचारी वर्गाची उपस्थितीही फारशी नव्हती.
पावसामुळे कर्मचारी आणि अधिकारी घर पोहचायचे म्हणून निघून गेले होते. सहा साडेसहाच्या दरम्यान एक महिला थेट फडणवीसंच्या कार्यालयात घुसली आणि आराडाओरडा करायला सुरूवात केली.कर्मचाऱ्यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत तिने झाडांच्या कुंड्या फेकून दिल्या. दालनाबाहेर लावलेली फडणवीसांच्या नावाची पाटीही काढून त्यांनी फेकून दिली. पोलीस येईपर्यंत त्या महिलेने मंत्रालयातून पळूनही गेली.
‘इराणने मोठी चूक केली,त्यांना किंमत मोजावी लागेल’
पण रात्री उशिरापर्यंत ही महिला कोण होती हे समजू शकले नाही. त्यानंतर सुरक्षा विभागाकडून संबंधित महिलेचा शोध घेणे सुरू झाला.पण या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. धक्कादायक म्हणजे थेट फडणवीसांच्या कार्यालयाचीच नासधूस होत असताना पोलीस कुठे होते. महिला कोणत्या कामासाठी मंत्रालयात आली होती. तिला पास कोणी दिला. फडणवीसांच्या कार्यालयाची नासधूस करण्यासाठीच आली होती की इतर कामासाठी, नासधूस कऱण्यामागचा हेतू काय आणि एवढ सगळं करूनही ती पसार कशी झाली, सुरक्षा यंत्रणेचे लक्ष नव्हते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते.