अंबड(प्रतिनिधी)
पं. राम देशपांडे यांच्या जोगकंस,ईश्वर घोरपडे यांचा रागेश्रीकंस,आसावरी देगलूरकर-देसाई यांचा पुरीया कल्याण,राजेंद्र कुलकर्णी-प्रमोद गायकवाड यांनी बासरी-शहनाईवर सादर केलेला गोरख कल्याण आणि संवादीनीवर शांतिभूषण देशपांडे यांनी सादर केलेला राग शामरंजनी यांनी चोखंदळ रसिक श्रोत्यांना अभिजात भारतीय संगीताची तृप्त करणारी सांगीतिक मेजवानी दिली.शतकोत्तर श्री दत्त जयंती संगीतोत्सव,तिसऱ्या सायंकालीन सत्रात शनिवारी सत्राची सुरुवात ‘तुम्हा तो शंकर सुखकर हो’ या संगीत सौभद्र मधील नांदीने झाली.पं. विश्वनाथ दाशरथे आणि त्यांच्या श्रीराम संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने झाली.

यानंतर पुणे येथी आसावरी देगलूरकर-देसाई यांनी राग पुरीया कल्याण सादर केला. विलंबित एक तालातील बंदिशीचे बोल होते ‘आज सुभन बना ‘ तर द्रुत तीनतालातील बोल होते ‘बहुत दिन बिते दिन बिते’ विशेष म्हणजे आसावरीने दत्त जयंती संगीतोत्सवात बालपणी देखील तयारीने गायन सादर केले होते.आपले वडील पं. शिवदास देगलूरकर यांच्याकडेच तिचे शिक्षण झालेले असल्याने तीही मेवाती घरण्याचेच गाणे सादर करते.आलाप,सरगम आणि गायनातील माधुर्य हे तिच्या गायनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.त्यांना तबल्यावर जगमित्र लिंगाडे तर संवादिनीवर यश खडके यांनी सुरेख साथसंगत केली.

यानंतर हिंदुस्थानी अभिजात संगीतात साथीचे म्हणून ओळखले जाणारे वाद्य हार्मोनियम ज्याला संवादिनी असेही म्हंटले जाते आशा लोकप्रिय वाद्याची शांतीभूषण देशपांडे (छत्रपती संभाजीनगर) यांनी स्वतंत्र मैफल सजवली.आपल्या वादनासाठी त्यांनी राग शामरंजनी या रागाची निवड केली.त्यात त्यांनी आपल्या बोटांची जादू दाखवून दिली. दत्त जयंतीचे औचित्य साधून त्यांनी ‘अमृताहूनी गोड नाम तुझे देवा’ हे भक्तीगीत आणि ‘नारायणा रमारमणा’ हे नाट्यगीत सदर केले.त्यांना तबल्यावर प्रशांत गाजरे आणि पखवाजवर विश्वेश्वर जोशी यांनी साथ केली.मुळात गोड असणाऱ्या या वाद्याची मधुरता अधिक वाढवली.

श्री ईश्वर घोरपडे ( पुणे ) …
रागेश्री आणि मालकंसचे मिश्रण असणारा राग रागेश्रीकंस विलंबित रूपक तालात ‘हे सूर साधे ‘ ही बंदिश तर द्रुत एकतालात..’मानो मानो बात मेरी हे पिया’ ही बंदिश सादर केली. आपल्या आक्रमक आणि तितक्याच नजाकतदार गायकीने ईश्वर घोरपडे यांनी श्रोत्यांना तल्लीन तर केलेच पण सोबत गुणगुणायलाही भाग पाडले.तरुण गायक आपल्या गाण्यावर किती मेहनत घेतात हे घोरपडे यांच्या प्रत्येक सूर,ताण,सरगम यातून दिसून येत होते.त्यांना
तबल्यावर प्रशांत गजरे आणि संवादिनीवर शांतिभूषण देशपांडे यांनी त्यांना साथसंगत केली.राग भीम पलासवर आधारित पण ठेवण अन मांडणी किंचित भिन्न केली की कसा भाव बदलतो हे एक कोकणी आणि दोन भक्तीगीते गाऊन त्यांचे गायन वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.त्यांना श्रोत्यांनी उभा राहून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

पं.राजेंद्र कुलकर्णी आणि पं. प्रमोद गायकवाड (पुणे) यांचे बासरी आणि शहनाई सहवादन राग .गोरख कल्याण सादर केला. विलंबित ऐकतात आणि द्रुत तीनतालात त्यांनी आपले सुरेल सहवादन सादर केले,एकमेकांच्या सूरसंगती समजून घेत आणि कुठेही वरचढ होण्याचा प्रयत्न न केल्यास वादन किती आनंद देते याची प्रचिती कुलकर्णी-गायकवाड यांच्या सहवादानातून आली, त्यांना तेवढीच तोलामोलाची तबला संगत अनिरुद्ध देशपांडे यांनी दिली.आपल्या सहवादनाची सांगता त्यांनी एक बनारसी धून वाजवून केली.
पं. राम देशपांडे ( मुंबई )
राग जोग कंस, विलंबित एकतालतील पारंपरिक बंदिशीचे बोल होते ‘हे सुगर बरपायी’ तर मध्यलय तीनतालातील बंदिशचे बोल होते ‘ पीर परायी ना जाने’ यानंतर त्यांनी जोगकंसमध्येच द्रुत लय एकतालमध्ये ‘कैसे ध्यान धरू मै अज्ञानी बालक’ हे रचना सादर केली.जोगकंस रागातील सारे सौंदर्य पं. देशपांडे यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर करीत श्रोते मंत्रमुग्ध केले.दत्त जयंतीचे औचित्य साधत त्यांनी ‘दत्त माझी माता,दत्त माझा पिता, बहीण बंधू चुलता दत्त माझा’ हे दत्तगुरुवरील स्वरचित रचना सादर करीत वातावरण भक्तिमय केले.यानंतर ‘जमुना किनारे मोरा गाव,सावरे आयजैयो’ ही मिश्र गारा ठुमरी त्यांनी नजाकतीने पेश केली.भैरव ते भैरवी अशी 24 रागांची रागमालेत ‘ वंदे मातरम’ ही स्वरचित रागमाला सादर केली .डोळे झाकून या रागमालेचे श्रोत्यांनी श्रवण केले तेव्हा प्रत्येकाच्या मनात भक्तिभाव दाटून आला होता,या रागमालेने दुसऱ्या दिवसाची अन तिसऱ्या सत्राची सांगता झाली. यावेळी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. ,राम देशपांडे यांना तबल्यावर प्रशांत गाजरे,संवादिनीवर यश खडके आणि पखवाजवर विश्वेश्वर जोशी यांनी साथसंगत केली.
पं. राम देशपांडे, ईश्वर घोरपडे यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध..
अंबड(प्रतिनिधी)
पं. राम देशपांडे यांच्या जोगकंस,ईश्वर घोरपडे यांचा रागेश्रीकंस,आसावरी देगलूरकर-देसाई यांचा पुरीया कल्याण,राजेंद्र कुलकर्णी-प्रमोद गायकवाड यांनी बासरी-शहनाईवर सादर केलेला गोरख कल्याण आणि संवादीनीवर शांतिभूषण देशपांडे यांनी सादर केलेला राग शामरंजनी यांनी चोखंदळ रसिक श्रोत्यांना अभिजात भारतीय संगीताची तृप्त करणारी सांगीतिक मेजवानी दिली.
शतकोत्तर श्री दत्त जयंती संगीतोत्सव,तिसऱ्या सायंकालीन सत्रात शनिवारी सत्राची सुरुवात ‘तुम्हा तो शंकर सुखकर हो’ या संगीत सौभद्र मधील नांदीने झाली.पं. विश्वनाथ दाशरथे आणि त्यांच्या श्रीराम संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने झाली.