मुंबई(प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला.विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारा आकडाही आघाडीतील कोणताही पक्ष गाठू शकला नाही.या धक्कादायक पराभवानं खचलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे हे आता वेगळंच लॉजिक पुढे रेटीत असल्याचे दिसत आहे?मात्र त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.विधानसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी दाखवत ती आश्चर्यकारक असल्याची साळसूद टिपण्णी करणाऱ्या शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांनी आकडेवारीनेच प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ज शरद पवारांसमोर थेट लोकसभा निवडणुकीत महायुतीतील भाजपसह, महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली मतं आणि त्यांचे निवडून आलेले खासदार यांचा दाखला देत जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी 2019 मधील लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसला मिळालेली एकूण मतं आणि त्यांच्या निवडून आलेल्या खासदाराचाही उल्लेख करत ‘दूध का दूध और पानी का पानी’ केलं आहे.
महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्यात पहिल्यांदाच शाब्दिक चकमक उडाली आहे. आपल्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणतात, शरद पवार आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? याकडे लक्ष वेधलं.
चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू म्हणत महायुतीची थेट आकडेवारीच मांडली.ते म्हणाले, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13.शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा मिळाल्याचं त्यांनी दाखवून दिलं आहे.
2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके असल्याचंही फडणवीस त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात. त्यावेळी काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली.तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं.आपल्या ट्विटमध्ये शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावतानाच महाविकास आघाडीतील पक्षांवरही निशाणा साधला आहे. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे असं फडणवीस म्हणाले.
काँग्रेसला राज्यात 80 लाख मते मिळाली असून त्यांचे 15 लोक निवडून आले. आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांना 79 लाख मते मिळाली.काँग्रेसपेक्षा एक लाख मते कमी पडली. त्यांचे 57 लोक निवडून आले.म्हणजे 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57. आम्हांला 72 लाख मते आहेत आणि उमेदवार 10 निवडून आले. अजित पवार पक्षाला मिळालेली मतं 58 लाख असून त्यांचे 41 उमेदवार निवडून आले. हे स्पष्ट केले आहे.