मुंबई(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी,युवक,युवती इत्यादीचा विकास घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण समिती (अमृत) Acadamy Of Maharshtra Research Upliftment and Training ल(AMRUT) या संस्थेच्या अमृत विकास सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य सदस्यपदी परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी बाजीराव (भय्या) धर्माधिकारी यांची निवड झाली आहे.
‘अमृत’चे राज्याचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी सदर निवडीचा प्रशासकीय आदेश शनिवार दि.7 डिसेंबर रोजी बाजीराव धर्माधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला.या समितीवर धर्माधिकारीयांच्यासह विश्वजीत देशपांडे, निखिल लातूरकर,क्षितिज पाटुकले यांची देखील निवड अमृत विकास सल्लागार समितीवर करण्यात आली आहे.’अमृत’च्या कार्यालयात आज अमृत विकास सल्लागार समितीची पहिली बैठक देखील संपन्न झाली.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब,ना.धनंजय मुंडे आणि महायुती सरकारचे आभार मानण्यात आले.
‘अमृत’च्या सर्व योजना महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजु होतकरु विद्यार्थी युवक युवतींपर्यंत पोचविण्यासाठी प्रामाणिकपणे आणि सचोटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी बाजीराव धर्माधिकारी यांनी व्यक्त केला.यावेळी सदस्य सचिव प्रियंकादेशपांडे व अमृतचे पदाधिकारी उपस्थित होते.या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून बाजीराव धर्माधिकारी, विश्वजित देशपांडे, निखिल लातूरकर, क्षितिज पाटकुले यांचे अभिनंदन केले आहे.