बीड( प्रतिनिधी) माझ्या पोटात वाढत असलेल्या छोट्या जीवाने मला त्या क्षणाला आधार दिला, जणू तिच्या स्पंदनातून ती म्हणत होती, ‘आई, तू हे करू शकतेस’!, अशी भावना भाजपच्या केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी व्यक्त केल्या.म्हणूम आज पाच वर्षांच्या वियानाला घेऊन मी पुन्हा एकदा शपथविधिच्या निमित्ताने विधिमंडळाच्या दारात उभी आहे. हा क्षण माझ्यासाठी एक आमदार म्हणूनच नव्हे तर एक आई म्हणून खूप आनंददायी, असल्याचे आ.नमिता अक्षय मुंदडा म्हणाल्या.
वियानाच्या डोळ्यांत माझ्याबद्दलचा अभिमान पाहून माझं हृदय भरून आलंय. तिच्या लहानशा हातांनी माझं बोट घट्ट धरलेलं पाहून वाटतंय संघर्षाचा प्रत्येक क्षण, त्यागाचं प्रत्येक पाऊल सार्थ ठरलं. दरम्यान, 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून त्यांचा केज विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढविलेल्या नमिता मुंदडा यांना पराभव पत्करावा लागला होता त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्या सलग दोन टर्म निवडून आल्या आहेत. उच्चशिक्षीत (आर्किटेक्ट) असलेल्या नमिता मुंदडा दिवंगत लोकनेत्या माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत. मागच्या निवडणुकीवेळी त्या काही महिन्यांच्या गर्भवती होत्या.
आता तिच त्यांची चिमुकली वियाना पाच वर्षांची झाली आहे. मागच्या वेळी ती गर्भात असताना शपथविधी घेतलेल्या मुंदडांनी यावेळी शपथविधीसाठी तीला सोबत विधीमंडळात आणले आणि सोशल मिडीयावर त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.