
नमस्कार…!
दि.०२|१२|२०२४
या दिवशी पासून मार्गशीर्ष मास चालू होत आहे.
॥ मार्गशीर्षमासाची माहिती ॥
🟣 विपुल धनप्राप्ति करता; या दिवशी पासून नक्तव्रत करावे. ( सकाळी उपवास धरावा आणि सूर्यास्तानंतर सोडावा. )
रोज रात्री लाल फुलं आणि लालरंगाचे वस्त्र श्रीविष्णुंना अर्पण करीत पूजा करावी. मासांती हे (पूजा वस्त्र) दक्षिणेसह ब्राह्मणांस दान द्यावे.
(वाराहपुराण)
🟣 मार्गशीर्षातील दर गुरुवारी दिवसभर उपवास करून; सायंकाळी श्रीलक्ष्मीनारायणाची पूजा करावी. लक्ष्मीअष्टोत्तरशत अथवा लक्ष्मीसहस्रनामाने कुंकुमार्चन करावे. बेसनाचा लाडू अथवा अनारशाचा नैवेद्य करावा. लक्ष्मीस्तोत्राचे पठण करावे. हे करण्याने श्रीलक्ष्मीनारायणाच्या कृपेंने विपुलश्रीप्राप्ति होते.
(ज्योतिषग्रंथ)
🟣 एकभुक्त राहून ब्राह्मण भोजन घातल्यास रोग व पापांचा नाश होईल.
(महाभारत)
🟣 ज्यांना या काळात थंडी बाधून रोग अथवा त्रास होत असेल त्यांनी सत्पात्री ब्राह्मणांस “लोकरीचे वस्त्र ” दक्षिणेसह दान करावे.
(महाभारत)
🟣 जर कोणाला ; स्मरणशक्तीची कमतरता अथवा बुद्धीची कमतरता वाटत असल्यास ; या मासात “श्रीसरस्वतीची भरीवमूर्ती ” प्राणप्रतिष्ठा पूर्वक पूजा करून; संकल्प पूर्वक – सत्पात्री ब्राह्मणांस दान करावी.
(महाभारत)
🟣 गूळ घालून केलेल्या; तांदूळच्या खिरीचा नैवेद्य ; नारायणास दाखविल्यास ; इहलोकी भोग व अंत्ये मोक्षप्राप्ती होते.
(महाभारत)
इति मार्गशीर्ष मासस्य कृत्यं…
वे.शा.सं.अमोलशास्त्री जोशी.
श्रुतिगंध वेदपाठशाळा,बीड.
९५११८६९१५५
श्रीगुरुदेव दत्त…!