
ठाणे (प्रतिनिधी ) 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. मात्र, तीन दिवस उलटून गेल्यानंतरही राज्यातील नवा मुख्यमंत्री कोण असणार याची घोषणा महायुतीकडून करण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली त्यामुळे तेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी शिवसेना नेते आणि कार्यकर्ते करत होते.आज ठाण्यात त्यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे म्हणाले की, मी 90 सभा घेतल्या, माझ्या पायाला भिंगरी लावून काम केले,मुख्यमंत्री म्हणजे कार्यकर्ता, सामान्य माणूस असं मी समजतो.म्हणून मी जेष्ठ नागरिक,बहिणी,बेरोजगार तरुण यांच्यासाठी मी काम केलं आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही परिवारातील प्रत्येक सदस्यास काहींना काही देण्याचा प्रयत्न केला,मी समाधानी ,आनंदी आणि खुश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं मला पाठबळ दिलं.मी त्यांना धन्यवाद देतो.राज्याच्या प्रगतीचा वेग वाढला कारण राज्यात आणि केंद्रात एका विचाराचं सरकार होतं. पत्रकारांचे प्रश्न सोडवले.राज्य एक नंबरवर नेलं.आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे आमच्यावर मतांचा वर्षाव झाला. मिळालेला विजय हा ऐतिहासिक आहे.रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेन.आता यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुसरीकडे भाजपला प्रचंड मोठ्या प्रमाणात विजय मिळाला असून ते जवळजवळ बहुमतापर्यंत पोहचले आहेत. अशावेळी आता भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी केली जात होती.आता मुख्यमंत्री कोण होणार याचा तिढा सुटलेला आहे.या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच एकनाथ शिंदे हे आपल्या ठाण्यातील निवासस्थानी परतले त्यांनी आपल्या सर्व आमदारांना त्यांच्या-त्यांच्या मतदारसंघात जाण्यास सांगितलं होतं.
भाजप पक्षश्रेष्ठी सुद्धा हे त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे यांची एक प्रकारे कोंडी झाली होती. अशावेळी त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून आपली नेमकी भूमिका मांडली.मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरून अनेक तर्क-वितर्क आणि चर्चा सुरू असताना पत्रकार परिषदेत शिंदे काय यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील आग्रही होते . अशावेळी अचानक पत्रकार परिषद बोलावून शिंदे यांनी भूमिका स्पष्ट करीत निर्णय दिल्याने राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.