
आपली कला राष्ट्रसेवेला समर्पित करण्याची प्रेरणा संस्कार भारती देते-प्रमोद कुलकर्णी.
बीड/वार्ताहर
संस्कार भारती कलावंतांना प्रोत्साहित करतानाच त्यांच्यावर आपली कला राष्ट्र सेवेसाठी समर्पित करण्याची प्रेरणा देते असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांनी केले. ते संस्कार भारतीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित कुटुंब मेळाव्यात बोलत होते .यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत संस्कार भारतीचे पूर्व अध्यक्ष भरतअण्णा लोळगे ,संस्कार भारतीचे देवगिरी प्रचार प्रमुख महेश वाघमारे ,बीडचे अध्यक्ष प्रमोद वझे हे उपस्थित होते. कार्तिक पौर्णिमेनिमित्त संस्कार भारतीच्या वतीने कुटुंब मेळाव्याअंतर्गत बीड येथील ऐतिहासिक दीपमाळेवर सहस्त्रदिपालंकार आणि गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी भव्यदिव्य रांगोळी काढून ही रांगोळी दिव्यांनी सजविण्यात आली होती.

संस्कार भारतीची बीड शाखा ही सातत्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून प्रतिथयश आणि नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देत भारतीय कला आणि संस्कार रुजवण्यासाठी मोलाचे कार्य करीत असल्याचे जेष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी म्हणाले,देवगिरी कलासंगम,सातत्याने आयोजित केला जाणारा भारतभर प्रसिद्ध असणारा कनकालेश्वर मोहोत्सव आदी कार्यक्रमाचा कुलकर्णी यांनी आवर्जून उल्लेख केला.हे कार्य निरंतर चालूच राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रतिवर्षाप्रमाणे संस्कार भारती बीडच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त कुटुंब मेळावा आणि गायन-वादनाचे आयोजन दीपमाळेवर करण्यात आले ,या कार्यक्रमाचा प्रारंभ विठ्ठल रुक्मिणी मूर्तींपूजन प्रमुख अतिथिंच्या हस्ते करून करण्यात आले. गायनाचा प्रारंभ संस्कार भारती गीताने करण्यात आला , याप्रसंगी बीड मध्ये कार्यरत असणाऱ्या संगीत विद्यालयाच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला यात सुदर्शन धुतेकर ,प्रकाश मानूरकर, सुग्रीव महाराज डाके ,नामदेव साळुंके, सचिन मार्गे, योगीराज वाघमारे नरहरी दळे यांचा समावेश होता.

यानंतर सुरभी निराळे , अथर्व खडकीकर, पल्लवी पंडित ,अवधूत घुगे, गौरव माने ओंकार कुलकर्णी (तबला सोलो) मृण्मयी आंदळकर, ओंकार देशपांडे (बासरी वादन) यांनी आपले गायन वादन सादर करीत उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ गायक सतीश सुलाखे यांनी भैरवी सादर करून या कार्यक्रमाची सांगितिक सांगता केली. गायक कलावंतांना हार्मोनियमची साथ सुदर्शन धुतेकर ,नामदेव साळुंके,सचिन मार्गे यांनी तर तबल्याची साथ नरहरी दळे, योगीराज वाघमारे ,पखवाजसाथ कृष्णा अणेराव यांनी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कार भारती बीडचे अध्यक्ष प्रमोद वझे यांनी केले , सूत्रसंचालन गणेश तालखेडकर यांनी तर आभारप्रदर्शन लक्ष्मीकांत सौंदत्तीकर यांनी केले . आभार डॉक्टर राहुल पांडव यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केदारनाथ बहिरमल, गणेश स्वामी, लक्ष्मीकांत खडकीकर ,अनंत सूतनासे, डॉ. राहुल पांडव ,लक्ष्मीकांत सौंदत्तीकर ,कोषप्रमुख संतोष पारगावकर, शहर प्रमुख स्नेहलताई पारगावकर ,डॉ.रवी शिवणीकर,ज्योतीताई सुलाखे,स्नेहल पाटील,अशोक कुलकर्णी ,सुरेश साळुंके ,श्रीपाद देशमुख आदींनी परिश्रम घेतले