बीड16 नोव्हेंबर (प्रतिनिधी):
“विविध भूलथापा देत, जातीपातीच्या भावनांना हात घालत अनेक उमेदवार तुमच्याकडे येतील. मात्र, खऱ्या वेळेस तुमच्या पाठीशी कोण उभा राहतो, हे समजून घ्या,” “गेल्या पाच वर्षांत विकासाच्या नावाखाली केवळ गोंधळ झाला. बिघडलेली परिस्थिती सुधारण्यासाठी महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर हे योग्य पर्याय आहेत. त्यांच्यामुळे बीड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होईल, आणि तुमच्या कोणत्याही कामात अडथळा येणार नाही.” असे आवाहन माजी मंत्री, लोकनेते जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.
पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की,
“आज निवडणुकीत गुटक्या वाले, वाळू वाले आणि क्लब वाले उभे आहेत. हे लोक तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेत आहेत. तुम्हाला फसवण्यासाठी भूलथापा देऊन मत मागतील, पण नंतर तुमच्याकडे फिरकणारही नाहीत. त्यामुळे धोका पत्करू नका,” याच कार्यक्रमाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले, “गोरक्षनाथ टेकडीसारखी ऐतिहासिक ठिकाणे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. आज गट-तट, जाती-धर्म विसरून, एकत्र येऊन योग्य निर्णय घेण्याची वेळ आहे. डॉ. योगेश क्षीरसागर यांना विजयी करून मतदारसंघाच्या विकासासाठी पुढे या.” कार्यक्रमाला माजी सभापती माधवराव मोराळे, बंडू नाना घुमरे, गणेश राऊत, श्यामराव राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वांगीण विकासासाठी योगेशला निवडून द्या.
नाळवंडी परिसर हा 40 वर्षापासून ताकदीने आमच्याबरोबर आहे. मागच्या निवडणुकीत निवडून दिलेल्या उमेदवाराकडून काही काम झाले काॽ आपल्या गावचा विकास झाला काॽ गावच्या भल्यासाठी काही करण्यात आले का ॽ याचा विचार आज प्रत्येक जन करत आहे . प्रत्येकाच्या वाट्याला निराशा आली.आता पुन्हा एक संधी आली आहे. घड्याळाचा गजर वाढवून झालेल्या चुका दुरुस्त करायची आणि योग्य वेळी योग्य उमेदवार निवड करण्याची संधी आज निवडणूकीच्या माध्यमातून आली आहे.डाॅ. योगेश क्षीरसागर हा नम्र आहे, राजकारणातले धडे शिकला आहे, विकासाची दृष्टी आहे, उच्च विद्याविभूषित आहे.त्याच्या पाठीशी आपली ताकद उभी करून प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन लोकनेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.या प्रसंगी व्यासपीठावर
जगदीश काळे, दिनकर कदम ,विलास बडगे, गंगाधर घुमरे, अरुण डाके, सखाराम मस्के, राजेंद्र राऊत, सुधीर काकडे, अरुण लांडे, संजय काळे, बालाप्रसाद जाजू, धनंजय जगताप, सुभाष तांगडे, गणेश राऊत, पंजाब काकडे, विष्णुपंत काळे, ईश्वर राऊत, सचिन घोडके, सुनील राऊत, अँड राजीव काळे, अच्युत शेळके, अंकुश राठोड, बाबासाहेब काळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.