गेवराई दि.१६(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी शिरस मार्ग व तरटेवाडी येथील कॉर्नर बैठकीमध्ये मतदार बांधवांना संबंधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत शिरसमार्ग येथील बंधाऱ्यामुळे या भागाची ओळख मोसंबी अशी झाली आहे. यासाठी भैय्यासाहेब यांनी अविरत असे परिश्रम घेतले आहेत. सिंदफना नदीच्या दोन्ही भागाची जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सिंदफना नदीवर ७ निम्न पातळी बंधाऱ्याची निर्मिती करण्याचे आश्वासन आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेले आहे. या बंधाऱ्यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघातील ३२ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या महायुतीच्या सरकारमधील सत्तेचा आपला वाटा मिळवण्यासाठी येत्या २० तारखेला घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
शिरसमार्ग व तरटेवाडी येथील कॉर्नर बैठकीसाठी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी पवळ, शिव शारदा मल्टीस्टेट बँकेचे संचालक अमरसिंह पवळ, समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुभाष पवळ, माजी पंचायत समिती सभापती पांडुरंग कोळेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहनराव पवार, खरेदी विक्री संघाचे सदस्य सोमेश्वर गचांडे, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य चत्रभूज करांडे, सरपंच सुरेश मार्कड, विकास सानप, कोळगाव चे सरपंच राजेंद्र कदम, सावरगाव चे सरपंच विष्णू पिसाळ, सुरेश पवळ, चेअरमन विजय पवळ, माजी सरपंच राहुल हजारे, रोहित लंबे, दादा कोळेकर, अमोल पवळ, सुनील मारकड, सुधाकर कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.