
गेवराई दि १४ (प्रतिनिधी) गेवराई विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधूंनी मला नेहमीच साथ दिलेली आहे. तुम्ही दिलेल्या मतदानरुपी आशीर्वादामुळेच येथून मी जिल्हा परिषद सदस्य झालो होतो. दादांनी या भागातील रस्त्याचे खडीकरण, दवाखान्याच्या इमारती, शाळांची इमारत अशी असंख्य विकास कामे केलेले आहेत तर भैय्यासाहेबांनी नळ योजना, तलावाचे काम केलेले आहे. मी मागील चोवीस वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून तुमच्या संपर्कात आहे. लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होतो. राज्यामध्ये महायुतीचे सरकार येणार आहे. या सरकारमध्ये आपला हक्काचा आमदार असावा म्हणून मला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
गेवराई विधानसभा मतदारसंघात त्यांनी मुदापुरी, माळहिवरा, शिराळा, केकत पांगरी, रोहितळ, डोईफोडवाडी, बेलगुडवाडी, कोलतेवाडी व ठाकर आडगाव या गावातील कॉर्नर बैठकीमध्ये बोलताना ते म्हणाले की, २००९ पासून आपण विधानसभेमध्ये नसल्याने मोठी कामे करता येत नाहीत. गावपातळीवर विविध कामे करायची आहेत. ती कामे करण्यासाठी आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा म्हणून आपण सत्तेमध्ये गेलो पाहिजे. विरोधक मराठा, मुस्लिम व दलित मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी संभ्रम निर्माण करत आहेत. परंतु मतदार राजा हा सुज्ञ आहे, तो विकासासाठी मला निवडून देईल. म्हणून निवडणूक देण्यासाठी घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला मोठ्या मतांनी विजयी करा. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शेख गफारभाई, माजी सरपंच प्रकाश शिंदे, एकदारा चे उप सरपंच प्रताप पाटील, रानमळा चे सरपंच बळीभाऊ चव्हाण, पांगरी चे चेअरमन रोहीदास चव्हाण, संजीत तेलुरे, पठाणआलम, आप्पासाहेब तेलुरे, जालींदर हाटोटे, कल्याण गिरे, सिध्देश्वर गिरे , शेख महमद, दिलीप गिरे, रामनाथ गिरे, शिवाजी, गिरे, सोमनाथ गिरे, हनुमान गिरे, रामभाऊ भोले, प्रल्हाद गिरे, अंगद गिरे, राजेंद्र गिरे, लक्ष्मण दिवाण, उध्दव शिंदे, राधेश्याम काकडे, राम माळी, किशोर पांचाळ, रमेश माळी, बबन भोले, संजय काकडे, शेख सौकत,याप्रसंगी त्यांच्या समवेत भाजप, शिवसेना, रिपाई,वंचित बहुजन आघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह परिसरातील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.