तुम्ही विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी रहा मी विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी ताकद राहतो. – अजीत पवार
गेवराई दी.१३(प्रतिनिधी) विजयसिंह पंडित हे विकासाचे व्हिजन असणारे नेतृत्व आहे. त्यांना गोदावरी नदीप्रमाणे सिंदफना नदीवर बॅरेजेस बांधायचे आहेत. उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढवायची आहे. विजयसिंहांमध्ये जिद्द व क्षमता आहे. अमरसिंह पंडित यांची साथ आहे. अशा नेतृत्वाच्या पाठीशी तुमची ताकद द्या. मी सर्व महाराष्ट्राची ताकद विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी लावतो. येणाऱ्या २० तारखेला घड्याळाचा गजर करा आणि विजयसिंहला विधानसभेत पाठवा. गेवराईच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही हा अजितदादाचा वादा आहे असे प्रतिपादन ना. अजित पवार यांनी केले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ गेवराई येथील सभेमध्ये बोलत होते.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ गेवराई येथे ना. अजितदादा पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, रिपाईचे जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे, बहुजन विकास मोर्चा चे बाबूराव पोटभरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे कल्याण आखाडे, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही विकासासाठी सरकार सोबत आहोत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्राचा अधिकाधिक निधी देण्याचा शब्द घेतला आहे. तुम्ही विजयसिंह पंडित यांना विजयी करा. गेवराई चा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी ४ हजार कोटी चा निधी उपलब्ध करून देईल. माझी लाडकी बहीण योजनने अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत. मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजने अंतर्गत सुमारे ५२ लाख कुटुंबांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. मागेल त्याला सौरपंप, शेती पंपाची वीजबिल माफी, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा, शेतकरी सन्मान योजना, युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना सहा हजार ते दहा हजार रुपये दिले जाणार आहेत.
विरोधक संविधान बदलणार असल्याच्या अफवा पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. जातीय सलोखा बिघडवला जात आहे. आपल्या संविधानाने देश अखंड ठेवण्याचे काम केले आहे. कोणीही संविधान बदलू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दलित व मुस्लीम अल्पसंख्याक समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. विधिमंडळात मुस्लिम समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व दिलेले आहे. अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (मार्टी), ची स्थापना करुन मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास १२०० कोटी पेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी बोलताना उमेदवार विजयसिंह पंडित म्हणाले की, गोदावरी व सिंदफणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या आपल्या मतदारसंघाच्या सिंचनासाठी गोदावरी नदी प्रमाने सिंदफना नदीचे पूर्नजीवन करायचे आहे. या नदीवर ७ बॅरेजेस बांधायचे आहेत. त्यामुळे ३२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यासाठी आदरणीय अजीत दादा पवार यांनी मदत करावी. विरोधक मात्र केलेल्या कामावर न बोलता आमच्यावर टिका करत आहेत. एकाने बौद्ध स्मशानभूमी पाहूण्याच्या नावावर केली तर दूसऱ्याने साव असल्याचा आव आणून अपक्ष उभे राहिले. त्यांनी खाजगी मार्केट कमिटीचे काय झाले? त्याचे उत्तर द्यावे असेही ते म्हणाले. मला एक वेळ संधी द्या असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी दादासाहेब चौधरी, बापू गाडेकर, अनील तूरुकमारे, शेख मन्सूभाई, मेराज भाई, मार्केट कमिटीचे सभापती मूजीब पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाचे प्रा. डॉ. सुनील मगरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटके विमुक्त आघाडीचे रविकांत राठोड, विजयकुमार वाव्हळ, राहूल राका, आजाद क्रांती सेनेचे राजेश घोडे, विनोद सौंदरमल, मारोती वाडेकर, दादाराव रोकडे, प्रताप पंडित, रवींद्र बोराडे, जगन्नाथराव शिंदे, कुमारराव ढाकणे, ॲड. शरद चव्हाण, सलीम शेख, गणेश सावंत, संतोष सुतार, फूलचंद बोरकर, विजय सुतार, उत्तम सोलाने, बाळासाहेब सानप यांच्यासह गेवराई विधानसभा मतदारसंघातील मतदार बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.सभेला गेवराई विधानसभा मतदारसंघातून रेकॉर्ड गर्दी जमली होती यावेळी विजयसिंह तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.