बीड (प्रतिनिधी)
बारामती सारखा विकास उगीच होत नाही ,त्यासाठी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून तिथला लोकप्रतिनिधी 24 तास राबतोय ,सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या कामाकडे लक्ष देतो तेव्हा कुठे बारामती आणि बारामती सारखा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बीड येथे बोलताना केले.
महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत बीड येथे बोलताना अजित पवार म्हणाले की बारामतीचा विकास हा सहज झाला नाही त्यासाठी ,तिथल्या लोकप्रतिनिधीने 25- 30 वर्ष घातले आहेत. कोणत्याही मतदारसंघाच्या विकासासाठी तिथला लोकप्रतिनिधी सक्षम असावा लागतो. विकास कामांना प्राधान्य द्यावे लागते. मी महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व आमदारांच्या मागणीमुळे सहभागी झालो आहे. कारण महाआघाडी सरकारचे दीड वर्ष करोणातच गेले होते. आमचे सारे आमदार म्हणाले की ,जनतेची कामे ठप्प झाली आहेत पुन्हा आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर मतदार संघातील कामे दाखवावी लागतील आणि ही कामे आपल्याला सरकारमध्ये गेल्याशिवाय करता येणार नाहीत, म्हणून मी महायुती सरकारमध्ये सहभागी झालो .
कोणत्याही मतदारसंघाचा विकास करण्यासाठी तिथे एमआयडीसी आणि त्याला जोडून विमानतळ असावे लागते. इथल्या नेत्यांनी बीडमध्ये उद्योगधंदे यावे अशी मागणी केली आहे. आगामी काळात ही मागणी मी नक्कीच पूर्ण करेल .जे काम पूर्ण करता येऊ शकते त्याचीच मी शाश्वती देत असतो ,म्हणून मी आगामी काळात बीडला नक्कीच औद्योगिक वसाहत उभा करून दाखवील असे अजित पवार म्हणाले. येत्या काळात पाणीपट्टी देखील कमी केली जाणार आहे कारण सर्व पाणीपुरवठा योजना या सोलारशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणीपट्टी नक्कीच कमी होईल. अजित पवार म्हणाले की,आपण मुस्लिम समाजाला दहा टक्के जागा दिल्या आहेत आणि त्याही निवडून येणाऱ्या, आष्टी -पाटोदा- शिरूर सारखाय नाही असा टोला त्यांनी यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मारला. जुन्या आमदाराने काम करणे बंद केले होते असा आरोप ही त्यांनी संदीप क्षीरसागर यांचे नाव न घेता केला .या जाहीसभेस आष्टीचे उमेदवार बाळासाहेब आजबे उपस्थित होते .व्यासपीठावर उमेदवार योगेश क्षीरसागर ,पालकमंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते जाहीर सभेस लोकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.