डॉ.दीपाताईंनी साधला सुसंवाद..
बीड (प्रतिनिधी)दीपाताई क्षीरसागर यांनी बीड शहर, परिसरातील विविध क्रीडा संघटना, त्यांचे पदाधिकारी, खेळाडू कलावंत, ब्युटीशीयन,भजनी मंडळे यांच्याशी संवाद साधत महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीमागे मोठे जनसमर्थन उभे केले आहे. डॉ.दीपाताई या नाट्यपरिषेदेच्या माध्यमातून विविध कलावंताच्या पाठीमागे सक्रियपणे उभ्या राहतात,वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या अयोजनातून कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात तर डॉ.योगेश क्षीरसागर हेही विविध क्रीडा संघटनांच्या पाठीशी राहून प्रोत्साहन देतात. या पार्श्वभूमीवर डॉ.दीपाताईंना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
दिपाताई क्षीरसागर यांच्या उपस्थितीत बीडमध्ये कलावंत, ब्युटीशियन्स यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला सुदर्शन धुतेकर, अमर डागा, विलास सोनवणे, सुहास पालीमकर, डॉ.संजय पाटील देवळाणकर, बासेद खान, नितीन प्रधान, डॉ.दुष्यंता रामटेके, दीपक जमधाडे, ॲड.रणजीत वाघमारे, महेश कुलकर्णी, सोनल पाटील, हेमा विभूते, सचिन राऊत, सचिन आगवान, देवा दहे, बालाजी मानगिरे, अमित गाडे, आकाश जाधव, माया जोशी, अनामिका अहिरे, पवन साळवे, सिद्धार्थ अग्रवाल, संतोष कसबे, गणेश तालखेडकर, पल्लवी कुलकर्णी, स्नेहल मुळे, केशव बडे, अक्षय फुलझळके, अनिल बडे, सुरेश थोरात, अनिता शिंदे, मिलिंद शिवणीकर, आम्रपाली गायकवाड, विनोद दळवी, राहूल पांडव, किशोर धुताडमल ,आकांक्षा अहिरे, सुरेश साळुंके, प्रमोद रामदासी,उज्वल गायकवाड, नामदेव साळुंके, सोनाली शाहाणे, माधव जोशी, रविराज जेधे यांच्यासह वेगवेगळी भजनी मंडळ, ब्युटीपार्लर चालक, तेजस्विनी, हिरकणी, कल्पतरू आदी ग्रूपचे संचालक आणि परिसरातील रसिक – कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडा संघटनांची बैठक
दीपाताई क्षीरसागर यांनी बीड शहर, परिसरातील विविध क्रीडा संघटना, त्यांचे पदाधिकारी, खेळाडू यांची बैठक घेतली. या बैठकीला क्रिकेट, व्हॉलीबॉल, तायक्वांदो, रस्सीखेच, स्विमींग, लॉन टेनिस, खोखो, जिमनॅस्टिक, जंम्प्रो, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, सॉफ्टबॉल, कुस्तीगीर, सपटकारा अशा विविध संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.