
गेवराई -(प्रतिनिधी) गेवराई विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन चकलंबा येथे करण्यात आलेले आहे. सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी केलेले आहे.
महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचारार्थ गेवराई विधानसभा मतदारसंघात मान्यवरांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता चकलंबा येथे आ. पंकजा मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेले आहे. यावेळी आ. पंकजा मुंडे
यांच्या सभेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, रिपाई कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बापुसाहेब गाडेकर, रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, वीर लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब रोकडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे यांच्यासह महायुतीतील घटकपक्षाचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी केले आहे.